Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

V-Guard Industries: व्ही-गार्ड इंडस्ट्रीज किचन अप्लायन्स मेकर सनफ्लेमला ₹ 660 कोटी रुपयांना खरेदी करणार

V-Guard Industries

इलेक्ट्रिकल आणि गृह उपकरणे बनवणारी कंपनी व्ही-गार्ड इंडस्ट्रीजने (V-Guard Industries) कालच सांगितले की ते स्वयंपाकघरातील उपकरणे बनवणारी सनफ्लेम एंटरप्रायझेस (Sunflame Enterprises Private Limited) 660 कोटी रुपयांना विकत घेणार आहेत.

इलेक्ट्रिकल आणि गृह उपकरणे बनवणारी कंपनी व्ही-गार्ड इंडस्ट्रीजने कालच सांगितले की ते स्वयंपाकघरातील उपकरणे बनवणारी सनफ्लेम एंटरप्रायझेस 660 कोटी रुपयांना विकत घेणार आहेत. व्ही-गार्डने एका निवेदनात म्हटले आहे की, सनफ्लेम एंटरप्रायझेसमधील 100 टक्के भागभांडवल मिळविण्यासाठी निश्चित करार केला आहे. सुमारे 660 कोटी रुपयांचा हा करार पूर्णपणे रोखीने असेल. हा करार जानेवारीच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

व्ही-गार्डला व्यवसाय वाढण्याची अपेक्षा (V-Guard expects business to grow)

दिल्लीस्थित सनफ्लेम ही कर्जमुक्त कंपनी असून तिच्याकडे जवळपास 50 कोटी रुपयांची रोकडही आहे. मात्र, ही रक्कम सनफ्लेमच्या प्रवर्तकांकडून व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच काढली जाईल. व्ही-गार्डचे व्यवस्थापकीय संचालक मिथुन चित्तीलाप्पिल्ली म्हणाले की, प्रस्तावित अधिग्रहणासाठी अंतर्गत जमा आणि कर्जाद्वारे निधी दिला जाईल. मात्र, त्यांनी तपशील दिलेला नाही. सनफ्लेमच्या अधिग्रहणासह व्ही-गार्डला स्वयंपाकघरातील उपकरणांचा व्यवसाय वाढण्याची अपेक्षा आहे. सनफ्लेम ब्रँडची संपूर्ण भारतामध्ये उपस्थिती मजबूत ब्रँड रिकॉलसह आहे. SEPL (Sunflame Enterprises private Limited) चा विस्तृत पोर्टफोलिओ, उत्पादन विकास क्षमता आणि अलीकडेच स्थापित केलेली अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन सुविधा V-Guard ला त्याच्या किचन अप्लायन्सेसचा व्यवसाय वाढवण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देईल.

व्ही-गार्ड योग्य संस्था  (V-Guard is right organization)

दरम्यान, के.एल. वर्मा, व्यवस्थापकीय संचालक, एसईपीएल (Sunflame Enterprises private Limited) म्हणाले की, 1984 मध्ये हा प्रवास सुरू केला, तेव्हापासून ते खूप पुढे आले आहेत. व्ही-गार्ड, ट्रस्ट हा वारसा पुढे नेण्यासाठी योग्य संस्था आहे.

व्ही-गार्ड इंडस्ट्रीजच्या उत्पादनांविषयी (About V-Guard Industries products)

V-GUARD व्होल्टेज स्टॅबिलायझरपासून डिजिटल UPS, इन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर बॅटरी, इलेक्ट्रिक वॉटर हीटर्स, सोलर वॉटर हीटर्स, घरगुती पंप, कृषी पंप, इंडस्ट्रियल मोटर्स, डोमेस्टिक स्विच गियर्स, डिस्ट्रिब्युशन बोर्ड्स, वायरिंग केबल्स, औद्योगिक Cables, इंडस्ट्रियल सी. इंडक्शन कुकटॉप, मिक्सर ग्राइंडर, पंखे, तांदूळ कुकर, गॅस स्टोव्ह, सोलर पॉवर सिस्टम आणि एअर कूलर आदि उत्पादने निर्मिती करतो.

सनफ्लेम विषयी (About Sunflame)

सनफ्लेमने (Sunflame Enterprises Private Limited) तीन दशकांहून अधिक काळ भारतीय किचनमध्ये आपल्या उपस्थितीसह गृहिणींना तंत्रज्ञानातील अद्ययावत आणि स्वयंपाकाचा आनंददायी अनुभव देण्याचा सतत प्रयत्न करत आहे. ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याचा कंपनीचा सतत प्रयत्न असतो. नेहमी नवीन डिझाइन्स, तंत्रज्ञान, वैशिष्ट्ये आणि नवकल्पनांच्या शक्यतेचा शोध घेऊन सनफ्लेमने ग्राहकांसाठी उत्तम उत्पादने तयार करण्यात आपले नेतृत्व प्रस्थापित केले आहे.

सनफ्लेमची उत्पादनं (Products of Sunflame)

कुकटॉप, चिमणी, ओव्हन टोस्टर ग्रीलर, लहान उपकरणे, प्रेशर कुकर, स्वयंपाकाची भांडी, रूम हीटर, पाणी तापवायचा बंब, आपत्कालीन कंदील, पंखे, एलईडी बल्ब ही कंपनीची उत्पादनं आहेत.