One trillion Economy : जागतिक पातळीवर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा विशेष उल्लेख केला जात आहे. गेल्यावर्षीच भारतीय अर्थव्यवस्थेने 3.5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभी करून जागतिक क्रमवारीत पाचवे स्थान मिळवले. येत्या दोन वर्षात अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन व्हावी हे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर ठेवले आहे. देशाची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनपर्यंत पोहोचविण्यासाठी आता सर्व राज्यांनी चंग बांधला असून महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यांच्या पाठोपाठ उत्तरप्रदेशने सुद्धा येत्या काही वर्षात आपली अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन व्हावी या दृष्टिने प्रयत्न सुरू केले आहेत.
Table of contents [Show]
उत्तरप्रदेशची अर्थव्यवस्था
देशाच्या आर्थिक क्रमवारीमध्ये जीडीपीनुसार, उत्तरप्रदेश राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. या तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर मार्गक्रमण करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेतही भरीव योगदान देण्याचा मानस मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ठेवला आहे. उत्तरप्रदेश सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 6.9 लाख कोटीचा अर्थसंकल्प मांडला आहे. उत्तरप्रदेशचे आजवरचे हे सर्वात मोठे बजेट आहे. राज्याचा जीडीपी सुद्धा 19 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा अंदाज बांधला आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्व देशांची, राज्यांची आर्थिक स्थिती बिकट असताना उत्तर प्रदेश सरकारचा जीडीपी मात्र 16.8 टक्के होता.
अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी मुख्य क्षेत्र
अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी उत्तरप्रदेश सरकार जागतिक दर्जाच्या पायाभूत सोई-सुविधा उभारण्यावर अधिक भर देत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखून अधिकाधिक गुंतवणूक मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या 1 ट्रिलियन मिशनसाठी उत्तरप्रदेश सरकारने कृषी, पायाभूत सुविधा, उद्योगधंदे, शहरी व ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, संस्कृती आणि महसूल या क्षेत्रात सकारात्मक सुधारणा करून 1 ट्रिलियनचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे ठरवले आहे.
गुंतवणूक
अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आवश्यक असते ती म्हणजे गुंतवणूक. उत्तरप्रदेश सरकारही अर्थव्यवस्था वाढ व रोजगार निर्मिती या दुहेरी उद्देशाने अनेकानेक उद्योगधंदे निर्मिती व गुंतवणूकीला महत्त्व देत आहे. यासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजीत यूपी ग्लोबल इन्वेस्टर समीटच्या (UP Global Investor Summit) माध्यमातून उत्तरप्रदेश सरकारने तब्बल 35 लाख कोटीची गुंतवणूक मिळवली आहे.
Uttar Pradesh CM sets goal of USD 1 trillion economy in 4 years, asks officials to draw plan with focus on 10 sectors#UPInvestorsSummit #UPGoesGlobal #UPGIS23https://t.co/JMxOLLOQyM
— UP Investors Summit (@InvestInUp) April 3, 2023
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
उत्तरप्रदेश हे राज्य आता विविध क्षेत्रात ही आपला ठसा उमटवत आहे. दुग्ध, धान्य आणि उस उत्पादनामध्ये उत्तरप्रदेश राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. तर फळ उत्पादनामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या राज्यामध्ये 40 हून अधिक आयटी पार्क्स आहेत तर 25 सेझ (SEZ IT) आयटी पार्क्स आहेत. 13 स्मार्टसिटी प्रस्तावित आहेत. हेन्डलूम क्षेत्रात यूपी तिसऱ्या स्थानावर आहे. औषध उत्पादनाच्या एकुण राष्ट्रीय हिस्सामध्ये उत्तरप्रदेशचा हिस्सा 17 टक्के आहे. प्रादेशिक पर्यटनामध्ये उत्तरप्रदेश दुसऱ्या स्थानावर असून परदेशी पर्यटक भेटीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
Source : https://bit.ly/3McaxXD