• 24 Sep, 2023 01:49

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Airtel 5G Plans : एयरटेल नेटवर्क वापरताय? मग एयरटेल हे स्वस्त मस्त रिचार्ज प्लॅन जाणून घ्याच

Airtel

एकीकडे स्वतास्त रिचार्ज प्लॅन देणाऱ्या रिलायन्स जिओच्या ग्राहकसंख्येत वाढ होत असतानाच एयरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात मस्त असे काही प्लॅन आणले आहेत. जाणून घ्या Airtel चे स्वस्तात मस्त असे रिचार्ज प्लॅन.

सध्या देशात 5G सेवा देणाऱ्या दोन मोठ्या मोबाईल नेटवर्क कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी एक आहे एयरटेल आणि दुसरी आहे जिओ. देशातील बहुतांश मोठमोठ्या शहरात आता या दोन्ही कंपन्यांनी सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. अशातच या नेटवर्क कंपन्या त्यांचे रिचार्ज प्लॅन वारंवार वाढवत असतात अशी ग्राहकांची तक्रार असते. मात्र आता येणाऱ्या काळात या क्षेत्रातील स्पर्धा वाढणार असून ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे.

एकीकडे स्वतास्त रिचार्ज प्लॅन देणाऱ्या रिलायन्स जिओच्या ग्राहकसंख्येत वाढ होत असतानाच एयरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात मस्त असे काही प्लॅन आणले आहेत.

चला तर जाणून घेऊयात अशाच काही 300 रुपयांच्या आतील किमतीचे एयरटेलचे 5G रिचार्ज प्लॅन. एयरटेलच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार कंपनी 300 रुपये किमतीच्य आतील 3 प्लॅन सध्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे.

एअरटेलचा 239 रुपयांचा प्लॅन

एअरटेलने ग्राहकांना 239 रुपयांचा एक सुपर रिचार्ज प्लॅन ऑफर केला आहे. या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही दररोज 1GB इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग तसेच दररोज मोफत 100 SMS सुविधांचा लाभ घेऊ शकता.

एअरटेलचा 296 रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा हा 296 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लोकप्रिय आहे. यात ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या प्लॅनची वैधता 30 दिवसांपर्यंत आहे. यात ग्राहकांना 30 दिवसांसाठी  25GB डेटाचा लाभ मिळतो. तसेच यासोबत अमर्यादित कॉलिंग तसेच दररोज मोफत 100 SMS सुविधांचा लाभ देखील ग्राहकांना घेता येतो.

एअरटेलचा 265 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांपर्यंत असून हा रिचार्ज प्लॅन 5G युजर्स मोबाईल धारकांनाच घेता येणार आहे. .एअरटेलच्या या 265 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला अमर्यादित कॉलिंग आणि दिवसाला 100 एसएमएस सारखे फायदे देखील मिळतात.265 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 1 GB 5G डेटा वापरता येतो.