• 05 Feb, 2023 13:22

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gmail Filter Feature: नको असलेले ई-मेल टाळण्यासाठी वापरा 'हे' भन्नाट फिचर, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Gmail

Gmail Filter Feature: अनेकदा आपल्याला आलेले महत्त्वाचे ईमेल(Email) हे इतर प्रमोशनल मेल, न्यूजलेटर, वेगवेगळ्या ऑफर्सचे मेल यामध्ये हरवले जातात किंवा आपल्याला वेळीच सापडत नाहीत. अशावेळी 'Gmail Filter Feature' चा वापर तुम्ही नक्की करा.

Gmail Filter Feature: कोणत्याही अधिकृत कामासाठी सोशल मीडियातील प्रभावी माध्यम म्हणून आपण जीमेलचा(Gmail) वापर केला जातो. हल्ली आपण अनेक वेबसाईट्स आणि ॲप्सचा वापर करण्यासाठी Gmail च्या माध्यमातून लॉगइन करतो. त्यामुळे त्यासर्व ॲप्स, वेबसाईटचे पासवर्ड, कामाचे लॉगइन आयडी, ऑफिसमधून शेअर करण्यात आलेले अधिकृत मेल अशी बरीच माहिती आपल्या मेलमध्ये सक्रिय असते. पण Gmail उघडल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला प्रमोशनल मेल, न्यूजलेटर, वेगवेगळ्या ऑफर्स अशाच गोष्टींचे मेल्स पाहायला मिळतात. त्यामुळॆ आपले महत्त्वाचे मेल्स सापडत नाहीत किंवा अनेकदा स्किप होतात. मात्र या समस्येवर जीमेल फिल्टर(Gmail Filter) हा पर्याय उपलब्ध आहे. हा फिल्टर वापरायचा कसा, याबद्दल जाणून घेऊयात.

Gmail Filter वापरण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या

 • Gmail मधील इनबॉक्सच्या वरच्या उजव्या बाजूला असणाऱ्या गिअर आयकॉनवर सर्वप्रथम क्लिक करा
 • त्यानंतर डाउन मेन्युमधून ‘Setting’ हा पर्याय निवडा
 • सेटिंग पेजवर ‘Filter & Blocked Address’ हा पर्याय निवडा
 • त्यानंतर ‘Add New Filter’ या पर्यायाची निवड करा 
 • हे केल्यांनतर तुम्हाला एक पॉप अप दिसून येईल, ज्यामध्ये Email ID Filter करायच्या आहेत त्या टाका
 • नंतर Create Filter पर्याय निवडा

अशा प्रकारे तुम्ही फील्टर(filter) पर्यायाचा वापर करू शकता. याशिवाय जर तुम्हाला एखाद्या मेल आयडीवरून सतत मेल्स येत असतील तर तुम्ही त्यांना ब्लॉकही(Block) करू शकता, त्यासाठी कोणता पर्याय निवडावा हे जाणून घ्या.

Unsubscribe आणि Mass report बद्दल जाणून घ्या

 • Spam Mails पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अशा मेलला अनसबस्क्राईब(Unsubscribe) आणि मास रिपोर्ट(Mass report) करू शकता
 • हे करण्यासाठी Gmail मध्ये लॉग इन करून Spam Mail निवडा. 
 • यामध्ये कोणताही महत्त्वाचा Mail निवडला जाणार नाही याची खात्री करून घ्या 
 • Spam Mail निवडल्यानंतर ‘i’ आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर ‘ Report Spam किंवा Unsubscribe हा पर्याय दिसेल
 • त्यानंतर  तुम्हाला एक लिस्ट दिसेल,ज्यामध्ये महत्त्वाचे अकाउंट्स नसतील तर Spam Report करून Unsubscribe हा पर्याय निवडा
 • या प्रक्रियेनंतर तुम्हाला या अकाउंट्सवरून पुन्हा मेल येणार नाही