Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

US Regulator Warns Sun Pharma: ...नाहीतर औषधांवर कायमची बंदी घालू, अमेरिकेच्या FDA ची सनफार्मा कंपनीला ताकीद

US Regulator Warns Sun Pharma

Image Source : www.livemint.com

गुजरात राज्यातील हलोल या ठिकाणी सनफार्मा कंपनीचा औषध निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पातून गोळ्या औषधांची अमेरिकेतही निर्यात होते. मात्र, अमेरिकेच्या एफडीएने निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली असता यामध्ये अनेक चुका आढळून आल्या.

औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी सन फार्माला अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने (US Food and Drug Administration) सक्त ताकीद दिली आहे. कंपनीच्या गुजरातमधील निर्मिती प्रकल्पामधून तयार करण्यात आलेल्या औषधांमध्ये भेसळ असल्याचं US FDA ने म्हटलं आहे. औषधांचे उत्पादन करण्याच्या प्रक्रियेत गंभीर चुका आढळून आल्या असून जर या चुका दुरूस्त केल्या नाही तर अमेरिकेत औषध विक्री करण्यास कायमची बंदी घालू अशा कठोर शब्दात कंपनीला सुनावले आहे.

गुजरात राज्यातील हलोल या ठिकाणी सनफार्मा कंपनीचा औषध निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पातून  गोळ्या औषधांची अमेरिकेतही निर्यात होते. मात्र, अमेरिकेच्या एफडीएने केलेल्या निरीक्षणात त्यांना अनेक चुका आढळून आल्या. Good Manufacturing Practice (CGMP) पाळल्या जात नसल्याचा ठपका FDA ने सनफार्मा कंपनीवर ठेवला आहे. तुम्ही तयार करत असलेल्या औषधांमध्ये भेसळ असल्याचं थेट कंपनीला सांगण्यात आलं आहे. मागील वर्षी एप्रिल आणि मार्च महिन्यात निर्मिती गुजरातमधील निर्मिती प्रकल्पाची अमेरिकेच्या FDA ने पाहणी केली होती.

औषध निर्मितीमध्ये काय चुका आढळल्या?

नियमांचा भंग केल्यामुळे सन फार्मा कंपनीला वॉर्निंग लेटर पाठवण्यात आले आहे. मायक्रोबायॉलॉजिकल भेसळ रोखण्यासाठी कंपनीने पुरेशी काळजी घेतली नाही. तसेच असेप्टिक स्टरिलाइझेशन प्रक्रियेतही FDA ला चुका आढळून आल्या आहेत. औषध निर्मिती करताना ते दूषित होण्यापासून रोखण्यासाठी जी व्यवस्था किंवा प्रक्रिया करावी लागते, त्यांचे पालन करण्यात कंपनी अपयशी ठरली आहे.

ज्या ठिकाणी औषधांची निर्मिती केली तेथील जागा योग्य पद्धतीने डिझाइन केली गेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यात त्रुटी आहेत. जी औषधे स्टरिलाइझेशन प्रक्रिया करून बनवली जातात, ती औषधे दूषित होण्याचा धोका त्यामुळे वाढतो. औषधांनी निर्मिती, प्रक्रिया, पॅकेजिंग, मेंटनंन्स आणि सुविधा उपलब्ध करण्यात कंपनीने हलगर्जीपणा केल्याचे अमेरिकेच्या FDA ने म्हटलं आहे.