सध्या कॅशलेसचा जमाना सुरु झाला आहे. यामुळे लोक आता कमी रोख ठेवतात कारण ते युपीआय व्यवहारांवर अवलंबून असतात. अनेक वेळा काही समस्यांमुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागते. नवीन वर्षातही असेच काहीसे घडले. नवीन वर्षाच्या निमित्ताने युपीआय अचानक ठप्प झाला आणि लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत लोकांना नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पैसे खर्च करण्यात अडथळे येत असून नवीन वर्षाची सुरुवातच यूपीआयच्या नाराजीने सुरू झाली आहे. खरं तर, प्रचंड ऑनलाइन ट्रॅफिकमुळे, युपीआय (Unified Payments Interface) आधारित शेकडो पेमेंट अयशस्वी झाले आणि यामुळे हजारो खरेदीदारांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year Eve) समस्यांना तोंड द्यावे लागले. याबाबत अनेक युजर्सने ट्विटरवर (Twitter) तक्रारसुद्धा केली.
एटीएममधून सुद्धा पैसे मिळवण्यात त्रास
या प्रकरणातील एका अहवालानुसार, युपीआय आधारित सेवा वापरणाऱ्या लोकांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पेमेंट पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागला आणि लोकांना एटीएम वापरण्यास भाग पाडले. त्याचबरोबर जास्त प्रमाणात रोकड काढल्याने अनेक एटीएममध्ये पैसे मिळाले नाहीत.
युजर्सने व्यक्त केली नाराजी
या प्रकरणात एका युजरने लिहिले की युपीआय पेमेंट त्रुटीचा सामना करणारा मी एकमेव आहे का? तर तिथे, दुसर्याने पोस्ट केले की युपीआय पेमेंट डाउन...गेल्या 1 तासापासून काम करत नाही ज्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. या प्रकरणात, DownDetector.com नुसार, 53 टक्के लोकांनी त्यांच्या युपीआय ऍप्लिकेशनमध्ये समस्या नोंदवल्या, 37 टक्के लोकांनी पेमेंट करताना समस्या आणि 11 टक्के लोकांनी फंड ट्रान्सफर करताना समस्या नोंदवल्या.
गुगलने घेतली दखल
गुगल पे इंडिया (Google Pay India) च्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे, "हाय, हे बँक सर्व्हरद्वारे अनुभवलेल्या हेवी ट्रॅफिकमुळे असू शकते. तुम्ही काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करू शकता का? नाहीतर, तुम्ही तुमचा युपीआय आयडी बदलण्याचा प्रयत्न करू शकता आणि पुन्हा प्रयत्न करू शकता.”