अर्थसंकल्पात कर प्रणाली (Tax Slab Simplified) सुटसुटीत करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीत पाच कर स्तर करण्याची घोषणा आहे. यापूर्वी नवीन कर प्रणालीत सहा कर स्तर होते. याशिवाय करदात्यांना रिबेटचा फायदा दोन लाख रुपयांनी वाढवून 7 लाख रुपये इतके करण्यात आले आहे.
यामुळे वैयक्तिक करदात्यांसाठी कर बचत होणार आहे. अर्नेस्ट अॅंड यंग या संस्थेने 60 वर्षाखालील वैयक्तिक करदात्यासाठी वार्षिक उत्पन्नावर किती कर द्यावा लागेल याचा अंदाज मांडला आहे. नवीन कर प्रणालीत 50000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे 750000 रुपयांवर कोणताही कर लागणार नाही. खालील आकडेनारीनुसार वार्षिक उत्पन्न आणि त्यावर किती कर द्यावा लागेल, हे पाहुया.
नवीन कर प्रणालीत खालील कर वजावटींचा लाभ करदात्याला मिळणार नाही.
- घरभाडे भत्ता (HRA)
- गृहकर्जावरील व्याजदर
- आयकर कलम 80 सी, 80 डी, 80 ई मधील कर वजावटी
- लिव्ह ट्रॅव्हल अलाउंस
- प्रोफेशनल टॅक्स
खालील आकडेनारीनुसार वार्षिक उत्पन्न आणि त्यावर किती कर द्यावा लागेल, हे पाहूया.
वेतनातून मिळणारे उत्पन्न (कर वजावट आणि कर सवलतींशिवाय) | जुनी कर रचना | नवीन कर रचना | प्रस्तावित नवीन कर रचना |
500000 | - | - | - |
550000 | - | 18200 | - |
600000 | - | 23400 | - |
700000 | - | 33800 | - |
750000 | 23400 | 39000 | - |
1000000 | 75400 | 78000 | 54600 |
1500000 | 210660 | 195000 | 145600 |
3000000 | 678600 | 663000 | 608400 |
7000000 | 2119260 | 2102100 | 2042040 |
15000000 | 5085990 | 5068050 | 5005260 |
60000000 | 25293762 | 25272390 | 22990500 |