Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023 : आधार-पॅन कार्डशी संबंधित मोठी घोषणा

Union Budget 2023

सरकारी योजनांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे ठरत असल्याचे आर्थिक सर्वेक्षण 2023 मध्ये सांगण्यात आले. अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) मध्ये आधार कार्ड, डिजी लॉकर आणि पॅनकार्ड बाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती कोणती? ते पाहूया.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) यांनी पाचव्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पॅनकार्ड (PAN Card) हे ओळखपत्र म्हणून स्वीकारले आहे. यासोबतच आधार कार्ड (Aadhar Card) आणि डिजी लॉकरवरही मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या भाषणात सांगितले की सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅन कार्ड ओळखले जाईल. यासोबतच युनिफाइड फाइलिंग प्रोसेस सेटअपही केला जाईल. त्याचे वन स्टॉप सोल्यूशन, आयडेंटिटी आणि पत्त्यासाठी वापर केला जाईल. कॉमन पोर्टलद्वारे एकाच ठिकाणी डेटा असेल. त्याच्या मदतीने पुन्हा पुन्हा डेटा देण्याची गरज भासणार नाही. मात्र, यासाठी, वापरकर्त्याची संमती देखील आवश्यक असेल. पत्त्यासाठी डिजी लॉकर, आधारचा वापर केला जाईल. PAN च्या आधारावर कॉमन बिझनेस आयडेंटिफायर लाँच करण्यात आला. एमएसएमई (MSME), मोठ्या उद्योगांसाठी (DIGI Locker) डिजी लॉकर बनेल.

तज्ज्ञ काय म्हणाले?

बँकबाझारचे सीईओ अधील शेट्टी म्हणाले की, डिजिटल इंडियासाठी केवायसीमध्ये जोखीम आधारित एक सरलीकृत दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. आता प्रत्येक आर्थिक नियामक समीक्षा करेल आणि  केवायसी अपडेट जारी करेल. नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी सार्वजनिक वस्तूंना बिग डेटासाठी सक्षम करेल. डिजी लॉकर दस्तऐवजांची यादी विस्तृत केली जाईल. अर्थमंत्र्यांनी कोणती कागदपत्रे आहेत हे सांगितलेले नाही. आम्ही ईपीएफओ पासबुक, ePAN आणि फॉर्म 26AS मागितले होते. डॉक्युमेंट शेअरिंग व्यतिरिक्त, ते मोठ्या प्रमाणावर क्रेडिट सक्षम करेल.