Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ultratech कंपनी मध्य प्रदेशमधील India Cement कंपनी विकत घेणार?

Ultratech कंपनी मध्य प्रदेशमधील India Cement कंपनी विकत घेणार?

मध्य प्रदेशमधील इंडिया सिमेंट कंपनीचा प्लांट भारतातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी असलेली अल्ट्राटेक कंपनी विकत घेऊ शकते. एमपी इंडिया सिमेंटचा प्लांट विकत घेण्याच्या रेसमध्ये अल्ट्राटेक आघाडीवर आहे.

भारतातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्य प्रदेशातील इंडिया सिमेंटचा प्रकल्प विकत घेण्याची तयारी करत असल्याचे वृत्त सीएनबीसी आवाजने दिले. यामुळेच आज बाजारातील चढ-उतारामध्ये सिमेंट कंपन्यांच्या सेक्टरमध्ये मोठी हालचाल दिसून आली. यामागे ही डील होत असल्याची तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इंडिया सिमेंट कंपनी अल्ट्राटेक कंपनीसोबतच जेएसडब्ल्यू सिमेंट, बिर्ला ग्रुप आणि अदानी ग्रुपशी सुद्धा बोलणी करत आहे. चुनखडीच्या खाणींसह मध्य प्रदेशच्या प्रकल्पाची किंमत सुमारे 800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये इंडिया सिमेंटचे शेअर्स 9.50 टक्क्यांनी वाढून 269.10 वर पोहोचला. तर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 1.28 टक्क्यांनी वाढ झाली. आज मार्केट बंद होताना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा शेअर 6255.10 वर बंद झाला.

india cement shares price
Image Source : Moneycontrol.com  

इंडिया सिमेंटने यापूर्वी मध्य प्रदेशात 700 एकर जमिनीवर 3 एमटीपीए इंटिग्रेटेड प्लांट बांधण्याची योजना आखली होती. कंपनीने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये म्हटले होते की, सिमेंट प्लांट उभारण्यासाठी 184.53 हेक्टर चुनखडीची जमीन आणि मध्य प्रदेशात 68.55 एकर जमीन खरेदी केली. याशिवाय इंडिया सिमेंट्स राजस्थानमधील बांसवाडा येथील 1.5 एमटीपीए सिमेंट प्लांटची 1,500 ते 2,000 कोटी रुपयांना विकण्याचा विचार करत आहे. या डीलमधून मिळालेली रक्कम कंपनीवर असलेले कर्ज कमी करण्यासाठी वापरले जाणार आहे. 31 मार्च 2022 पर्यंत, इंडिया सिमेंट कंपनीवर 3,039.3 कोटी रुपयांचे कर्ज होते.