Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter वर नवे आर्थिक संकट, भाडे थकल्याने खटला दाखल

Twitter

Image Source : www.cnet.com

इलॉन मस्क त्याच्या धक्कातंत्रामुळे कायम चर्चेत असतात. सोबतच Twitter देखील कायम चर्चेत असते. आताही Twitter वर एक नवे आर्थिक संकट आले आहे. भाडे थकल्याने खटला दाखल झाला आहे. काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊया.

इलॉन मस्क त्याच्या धक्कातंत्रामुळे कायम चर्चेत असतात. सोबतच ट्विटरदेखील कायम चर्चेत असते. आताही Twitter वर एक नवे आर्थिक संकट आले आहे. भाडे थकल्याने खटला दाखल झाला आहे. काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊया.  

इलॉन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी स्वीकारल्यापासून ते सतत कंपनीच्या खराब आर्थिक स्थितीचे कारण देताना दिसत आहेत. खर्च कमी करण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कपातीपासून त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत मर्यादा आणलेल्या आहेत. असे असतानाही कंपनीची अवस्था इतकी बिकट आहे की ती आपल्या कार्यालयाचे भाडेही भरू शकत नाही, ही बाब पुढे आली आहे.

ट्विटर जगभरातील आपल्या कार्यालयांचे आणि मुख्यालयांचे भाडे भरण्यास असमर्थ आहे. आता असे समोर आले आहे की ट्विटरवर त्याच्या सॅन फ्रान्सिस्को कार्यालयाचे भाडे न भरल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला आहे.

लीज कंपनीने  दिला होता इशारा 

ट्विटरने त्याच्या सॅन फ्रान्सिस्को कार्यालयासाठी 1 लाख 36 हजार 250 डॉलर इतके भाडे थकलेले आहे.  संबंधितांचे म्हणणे आहे की,  त्यांच्याकडून  16 डिसेंबर रोजी कंपनीला इशारा दिला की, हार्टफोर्ड इमारतीच्या 30व्या मजल्यावरील भाडेपट्टी पाच दिवसांत संपत आहे. भाडे न दिल्याने त्यांनी ट्विटरवर गुन्हा दाखल केला आहे.

ट्विटरच्या बुकमार्क फीचरमध्येही बदलाची घोषणा

ट्विटरवर अनेक बदल अलीकडच्या कालावधीत झाले आहेत. या बदलांच्या यादीत आणखी एक बदल नोंदवला आहे. हा बदल बुकमार्क फीचर्सशी संबंधित आहे. मायक्रोब्लॉगिंग साइटचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विट करून प्लॅटफॉर्मच्या 'बुकमार्क्स' फीचरच्या यूजर इंटरफेसमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे.