एलन मस्क (Elon Musk) यांनी कंपनीच्या सद्यस्थितीवर ट्विट करून खुलासा केला आहे. पुढची कोणतीही पावलं उचलण्यापूर्वी कंपनीचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह असावा, असं ते म्हणाले आहेत. जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती, अब्जाधीश असलेल्या मस्क यांनी मागच्या वर्षी ट्विटर (Twitter) विकत घेतलं. मात्र बहुतेक जाहिरातदार या प्लॅटफॉर्मपासून दूर गेले होते. कंटेंट पॉलिसीत बदल, मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात आणि भविष्यातली अनिश्चितता यामुळे कंपनीचा तोटा (Loss) वाढत चालला आहे. नवभारत टाइम्सनं याविषयीचं वृत्त दिलं आहे.
धोरणं अंगलट
मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून कंपनीत प्रचंड अनागोंदी आहे. मस्क यांनी सर्वप्रथम कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह चार अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर जगभरात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता अनेक वेळा ट्विटरची पॉलिसी बदलली, जाहिरातदारांना परत आणण्यासाठी सीईओ म्हणून लिंडा याकारिनो यांची नियुक्ती केली आहे. यासह इतर अनेक बदल केले, ज्यामुळे कंपनी सातत्यानं तोट्यात जात आहे.
थ्रेड्सनं थकवलं
मार्क झुकरबर्ग यांची कंपनी मेटा प्लॅटफॉर्मनं अलीकडेच थ्रेड्स लॉन्च करून ट्विटरच्या अडचणीत भर घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 एप्रिल ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या पाच आठवड्यांमध्ये, ट्विटरच्या जाहिरात महसूलात गेल्या वर्षीच्या तुलनेत 59 टक्के झाली आहे. मस्क यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्विटर विकत घेतले आणि तेव्हापासून त्याच्या टॉप 1000 जाहिरातदारांपैकी फक्त 43 टक्के राहिले आहेत.
ट्विटरसाठी कठीण काळ - मस्क
ट्विटरसाठी हा खूप कठीण काळ आहे, असं मस्क मागच्या महिन्यात म्हणाले होते. आमचा महसूल अर्ध्यावर आला आहे. ब्रेक इव्हन गाठण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. दरम्यान, ट्विटरच्या या कठीण काळात मेटाच्या थ्रेड्सनं आणखी भर घातली आहे. मेटाचं थ्रेड्स (Meta's Threads) लाँच केल्याच्या एका आठवड्यात 100 दशलक्षाहून अधिक डाउनलोड केलं गेलं आहे. त्यामुळे येत्या काळात ट्विटर समोरच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.