Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Earn money from Twitter : एलन मस्कप्रमाणे तुम्हीही ट्विटरवरून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

Earn money from Twitter : एलन मस्कप्रमाणे तुम्हीही ट्विटरवरून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

Earn money from Twitter : सोशल मीडिया हँडल ट्विटरवरून लाखो रुपये कमावण्याची तुम्हालाही संधी आहे. नुकतंच ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून कसं पॅसिव्ह इन्कम कमावलं जाऊ शकतं, हे सांगितलं होतं. आता तुम्हीही याचा विचार करून पैसे कमावण्याच्या तयारीला लागावं. त्यासाठी काय करावं लागेल, यावर एक नजर टाकू...

जगातल्या श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) कशी कमाई करतात, हे त्यांनी स्वत:च सांगितलं होतं. याविषयीचा स्क्रीनशॉट त्यांनी ट्विटरवर शेअर केला होता. आपल्या 24,700 सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून महिन्याला सुमारे 80 लाख रुपये कमवत असल्याचं समोर आलं. टेक जायंटनं एक स्क्रीनशॉट शेअर केला. याद्वारे त्यांचा एक्सक्लुसिव्ह कंटेंट सबस्क्राइब  करण्यासाठी दर महिन्याला 4 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत 330 रुपयांचं पेमेंट करणाऱ्यांची संख्या दर्शवली होती. मस्क आपल्या सबस्क्रायबर्सना खास असा कंटेंट देऊन पैसे पैसे कमवत आहेत. आता मस्क यांच्याप्रमाणे ट्विटरचे यूझर्सदेखील पैसे कमवू शकतात. मात्र अट हीच आहे की त्यांनी आपल्या फॉलोअर्सना क्वालिटी कंटेट (Quality content) प्रोव्हाइड करावा. म्हणजेच तुमच्याकडे काही एक्सक्लुसिव्ह किंवा काही वेगळेपण असेल तर असा कंटेंट तुम्ही तुमच्या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवायचा. त्यातून तुमची कमाई सुरू होणार आहे.

'असे' कमवा पैसे

स्क्रीनशॉट शेअर करून एलन मस्क यांनी यूझर्स ट्विटरवरून पैसे कसे कमवू शकतात, हे सांगितलं. त्यांनी म्हटलंय, की कंटेंट क्रिएटर्सनं प्लॅटफॉर्मवरच्या मोनेटायझेशन ऑप्शनचा वापर करून पैसे कमवू शकतात. त्यांनी म्हटलं, की कंटेंट क्रिएटर्सनी सबस्क्रिप्शनच्या ऑप्शनला इनेबल करावं. सेटिंग्समध्ये जाऊन मोनेटायझेशनला टॅप करावं. या माध्यमातून चांगली कमाई करण्याची संधी त्यांनी आपल्या यूझर्सना दिलीय. मस्क याच प्रमाणं आपल्या यूझर्सकडून 4 डॉलर चार्ज करतात. त्यांचे 24,700 सबस्क्रायबर आहेत. त्यानुसार त्यांची कमाई लाखात होतेय. 98,000 डॉलर म्हणजेच 80.9 लाख इतकी कमाई ते करत आहेत.

कुठे उपलब्ध पर्याय?

सध्या अशाप्रकारच्या पर्यायाच्या माध्यमातून कमाई करण्याची सुविधा यूएस, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, युरोपियन युनियन, यूके आणि ईईईमधल्या यूझर्ससाठी मर्यादित आहे. मात्र अशाप्रकारे कोणत्याही क्षेत्राची पर्वा न करता हा पर्याय वापरता येवू शकतो, असं संकेतस्थळावर सांगितलंय. यासाठी यूझर्सना वरच्या डाव्या कोपर्‍यात प्रोफाइल आयकॉन निवडावा लागेल आणि स्क्रीनच्या तळाशी असलेल्या प्रोफेशनल टूल्सवर टॅप करून मोनेटायझेशन पर्यायावर जावं लागेल. त्यानंतर सबस्क्रिप्शनवर क्लिक करावं लागेल.

ट्विटरवरचे प्रयोग

एलन मस्क हे ट्विटरवर 136.6 दशलक्ष फॉलोअर्ससह सर्वात जास्त फॉलो केले जाणारे व्यक्ती आहेत. मस्क यांच्या सुपर फॉलोअर्सना त्यांच्या स्पेसेसवर आयोजित केलेल्या चर्चांमध्ये एन्ट्री आहे. ते 'आस्क मी एनीथिंग' सेशनसाठीदेखील गोपनीय असेल. मागच्या वर्षी एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक प्रयोग करण्यास सुरुवात केलीय. हे प्रयोग ट्विटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह यूझर्ससाठीही डोकेदुखी ठरत आहेत. कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास वाढवणं, वेतनाच्या मर्यादा, कर्मचारी कपात तर यूझर्ससाठी शुल्क आकारणी या वादग्रस्त निर्णयांचा समावेश आहे. ट्विटर आपल्याला महागात पडल्याचंही मस्क यांनी अलिकडेच कबुल केलं होतं. आता आणखी एक प्रयोग या निमित्तानं केला जातोय.

जाहिरातदारांसाठी नियम

जाहिरातदारांसाठीही एक नवाच नियम करण्यात आलाय. ट्विटरवर जाहिरात देण्यासाठी जाहिरातदाराला व्हेरिफिकेशनसाठी आधी पेमेंट करावं लागेल. तसंच कमीत कमी मासिक खर्च यात जाहिरातीची प्रक्रिया असावी, असं सांगण्यात आलं. एकूणच एलन मस्क यांचा पैसे कमावण्याचा फंडाच यातून दिसून येतोय.