थ्रेड्स मेटाचं (Mets's Threads) टेक्स्ट बेस्ड अॅप आहे शिवाय इन्स्टाग्रामचाच (Instagram) ते एक भाग आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, की मेटाची ट्विटरची जागा घेण्याचं कोणतंही प्लॅनिंग नाही. मात्र आकडेवारीवरून ट्विटरला खूप नुकसान झाल्याचं सध्यातरी दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सिमिलर वेबनुसार (SimilarWeb) ट्विटर ट्रॅफिकमध्ये गेल्या वर्षीच्या याच दिवसाच्या तुलनेत जवळपास 12 टक्क्यांनी घट झाली आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
100 दशलक्ष लोकांचं थ्रेड्सवर अकाउंट
मोसेरी यांनी त्याच्या थ्रेड्स अकाउंटवर कंपनीनं ठरवल्यापेक्षाही खूप काही साध्य केल्यासंबंधी एक पोस्ट केली. पाच दिवसात 100 मिलियन लोकांनी थ्रेड्ससाठी साइन अप केलं आहे, असं त्यांनी त्यात म्हटलं. यादरम्यान, क्लाउडफ्लेअरचे सीईओ मॅथ्यू प्रिन्स यांनी ट्विटरला फटका बसला असल्याचं म्हटलं आहे. प्लॅटफॉर्मवरचं ट्रॅफिक कमी झाल्याचं दर्शवणारा स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केला आहे.
मागच्या वर्षीची याच कालावधीतली आकडेवारी
सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, अॅनालिटिक्समध्ये विशेषज्ज्ञता असलेली कंपनी सिमिलर वेबच्या मते, थ्रेड्स लाँच झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत ट्विटरवरचं ट्रॅफिक 5 टक्क्यांनी कमी झालं. कंपनीनं पुढे सांगितलं, की जर आपण गेल्या वर्षीच्या याच दिवसांच्या आकडेवारीची तुलना केली तर ट्रॅफिकमध्ये जवळपास 11 टक्के घट झाल्याचं दिसतं.
थ्रेड्सचा आपल्या नावावर विक्रम
थ्रेड्स त्याच यूझर्सना टॅप करतात, जे इन्स्टाग्रामवर आहेत. या अॅपचं लॉन्चिंग अशावेळी झालं आहे, जेव्हा ट्विटर अनेक अडचणींचा सामना करत आहे. ट्विटरनं आपल्या अनेक सेवा पेड म्हणजेच सशुल्क केल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा यूझर दुरावत चालला आहे. अनेक मर्यादा ट्विटरकडून घातल्या जात आहेत. त्यामुळे कंटाळलेले यूझर नव्या प्लॅटफॉर्मच्या शोधात होते. त्यांना थ्रेड्सचा पर्याय मिळाला आहे. दरम्यान, यूझर्स घटत चालल्यास ट्विटरच्या आर्थिक तोट्यात आणखीनच भर पडणार आहे.
दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकमेकांची खिल्ली
पनएआयच्या चॅटजीपीटीला सर्वात वेगानं वाढणाऱ्या अॅपचा किताब मिळाला. कारण दोन महिन्यांत त्यांचे 100 मिलियन यूझर्स होते. मात्र थ्रेड्सनं हा रेकॉर्ड मोडला आहे. ट्विटरवरही या नव्या अॅपबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ट्विटरचे वकील अॅलेक्स स्पिरो यांनी मेटाला एक पत्र लिहिलं आहे. याशिवाय मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि ट्विटरचे प्रमुख एलन मस्क हेदेखील आपापल्या प्लॅटफॉर्मवर एकमेकांची खिल्ली उडवताना दिसून येत आहेत.