Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Fires 90% Indian Staff :भारतीय कर्मचाऱ्यांवर Elon Musk यांची वक्रदृष्टी, 90% कर्मचारांना नारळ

Elon Musk, Twitter India Job Cut, Elon Musk

Twitter Fires 90% Indian Staff : गेल्या आठवड्यात एलन मस्क यांच्याकडून कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. मस्क यांच्या या निर्णयाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. गेल्या आठवड्यात या मास लेऑफमध्ये भारतीय कर्मचारी देखील होरपळून निघाले.

ट्विटरमधील भारतीय कर्मचाऱ्यांवर कंपनीचे नवीन मालक एलन मस्क यांची वक्रदृष्टी पडली आहे.मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यावर  प्रचंड मनुष्यबळ कपात केली आहे. याचा फटका आता भारतातील ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना बसला आहे.भारतातील तब्बल 90% कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. आता केवळ डझनभर कर्मचारी ट्विटरचे भारतातील कामकाज पाहणार आहेत. (Twitter Inc. fired more than 90% of its staff in India)

गेल्या आठवड्यात एलन मस्क यांच्याकडून कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. मस्क यांच्या या निर्णयाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. गेल्या आठवड्यात या मास लेऑफमध्ये भारतीय कर्मचारी देखील होरपळून निघाले. भारतातील 90% कर्मचाऱ्यांना ट्विटरने नारळ दिला असल्याची माहिती समोर आली आहे. यावर केंद्र सरकारने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरच्या कर्मचारी कपातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

भारतात ट्विटरचे जवळपास 200 कर्मचारी कार्यरत होते. त्यातील आता जवळपास 90% म्हणजे 180 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. भारतात ट्विटर आणि इतर सोशल मिडिया कंपन्यांसाठी व्यावसायिक संधी आहे, मात्र एलन मस्क यांच्या हटवादी भूमिकेने शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

भारतात ट्विटरचे दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु या शहरांमध्ये ऑफिस आहे.इंजिनिअरिंग आणि प्रोडक्ट डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.या दोन्ही विभागातील 70 % कर्मचारी आहेत.त्याशिवाय मार्केटिंग, पब्लिक पॉलिसी, कॉर्पोरेट कम्युनिकेशन या विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. सॅन फ्रान्सिस्को आणि कॅलिफोर्नियातून निम्म्याहून अधिक कर्मचारी ट्विटरने कमी केले आहेत. जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आले आहे.