Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Deal : ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट!

Twitter Deal : ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट!

टेस्लाचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) कंपनी बनावट खात्यांचा तपशील देण्यास अपयशी ठरल्याचे सांगत ट्विटर खरेदीचा करार मोडीत काढला आहे.

टेस्लाचे मालक इलॉन मस्क (Tesla owner Elon Musk) यांनी ट्विटर कंपनी बनावट खात्यांचा (Fake Accounts) तपशील देण्यात अयशस्वी ठरल्यामुळे ट्विटर खाते विकत घेत नसल्याचे जाहीर केले. पण यामुळे पुन्हा एकदा ट्विटरवरील बनावट खात्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बनावट खात्यांबरोबरच ट्विटरवर फेन युझरनाव वापरून फसवणूक केली जात आहे. याबाबतही ट्विटरद्वारे काहीच स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

एकाच नावाची दोन खाती!

ट्विटर ही सर्वांत मोठी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईट मानली जाते. या साईटवर जेव्हा साईन-अप करतो. तेव्हा तिथे आपले नाव आणि पासवर्डसोबत युझरनेमही (Password & Username) द्यावे लागते. हे युझरनेम युनिक असते; म्हणजे एकाच नावाचे दोन प्रोफाईल असणे शक्य नाही. पण एक मिनिट थांबा. कारण सध्या ट्विटरवर असे काही प्रोफाईल पाहण्यात आले आहेत. ज्यांचे युझरनेम सेम आहे; पण प्रोफाईल वेगवेगळे आहेत. उदाहरण म्हणून आपण दस्तुरखुद्द इलॉन मस्क याच्या नावाने सुरू असलेल्या दोन खात्यांवरून समजून घेऊ.

Duplicate Twitter accounts

https://twitter.com/eIonmusk आणि https://twitter.com/elonmusk अशी दोन खाती आहेत. यातील पहिलं खातं ट्विटरने आता सस्पेंड केलं आहे. पण ते यापूर्वी सुरू होतं आणि दुसरं खातं मात्र सुरू आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा हा की, एकाच नावाचे दोन खाती ट्विटरने तयार करण्यास परवानगी दिलीच कशी? कदाचित याच मुद्द्यावरून इलॉन मस्क याने ट्विटर खरेदी करण्याची डील रद्द केली असण्याची शक्यता आहे. कारण अशा बनावट खात्यांबाबत मस्कने ट्विटरकडे माहिती मागितली होती. पण ट्विटरने याची माहिती देण्यास टाळाटाळ केली असल्याचे समोर आले.

इलॉन मस्कने ट्विटर 44 बिलियन डॉलरला खरेदी करण्याची डील करण्यापूर्वी ट्विटरकडे काही गोष्टींची स्पष्टता मागितली होती. यामध्ये ट्विटरवर किती खाती बनावट आहेत. याची माहिती इलॉनने ट्विटरकडे मागितली होती. पण कंपनीकडून ही माहिती देण्यात टाळाटाळ होऊ लागल्याने इलॉन ही डील रद्द केल्याचे बोलले जात आहे. ट्विटर सध्या एकाच नावाची अनेक खाती असल्याचे दिसून येत आहे. यामुळे लोकांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. तसेच अशा बनावट खात्यांद्वारे आर्थिक फसवणूक होऊ शकते.

मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर पोलिसांची एकाच नावाने दोन खाती आहेत. https://twitter.com/GwaliorPolice आणि https://twitter.com/GwaIiorPolice ही दोन्ही खाती ग्वाल्हेरमधील पोलिस विभागाचीच आहेत आणि ही दोन्ही खाती सुरू आहेत. अशाच पद्धतीने खोटी खाती तयार लोकांची आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.