• 09 Feb, 2023 07:39

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TVS Motors Q3 Results: टिव्हीएस मोटर्सने केली 8 लाख दुचाकिंची विक्री, नफ्यात 22 टक्क्यांची वाढ!

TVS Motors Q3 Results

Image Source : www.bqprime.com

TVS Motors Q3 Results: टिव्हीएस मोटर्स ही लोकप्रिय कंपनीच्या तिमाहिचे निकाल सध्या जाहिर झाले आहेत. कंपनीच्या नफ्यात 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, उत्पन्न वाढून 6 हजार 545 कोटी रुपये झाले आहे. या तिमाहिच्या निकालात आणखी कोणत्या नोंदी करण्यात आल्या आहेत, ते या बातमीतून जाणून घ्या.

TVS Motors Q3 Results: आघाडीची दुचाकी उत्पादक टिव्हीएस मोटर्सने (TVS motors) 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत जोरदार वाढ केली आहे. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 6 हजार 545 कोटी रुपये झाले आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा 22 टक्क्यांनी वाढून 352 कोटींवर पोहोचला आहे. टिव्हीएस मोटर्सने तिसऱ्या तिमाहीत एकूण 8.36 लाख दुचाकींची विक्री नोंदवली.

निकालातील ठळक मुद्दे (Highlights of the result)

दिग्गज दुचाकी उत्पादक टिव्हीएस मोटर्सने नुकतेच, चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. टिव्हीए मोटर्सच्या मते, निव्वळ नफा वार्षिक आधारावर 22.1 टक्क्यांनी वाढला आहे, जो वाढून 352 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 288.3 कोटीच्या तुलनेत 352 चा निव्वळ नफा नोंदवला आहे.

टिव्हीएसने सांगितले की डिसेंबर तिमाहीत कंपनीचा परिचालन महसूल 15 टक्क्यांनी वाढून 6 हजार 545 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 5 हजार 706 कोटी रुपये होता. तिचा ऑपरेटिंग व्याज, कर, घसारा आणि कर्ज आदी कट होण्यापूर्वीची कमाई (EBITDA: Earnings before interest, taxes, depreciation and amortization) तिमाहीत 16 टक्क्यांनी वाढून 659 कोटी रुपये झाला. तर, गेल्या वर्षी याच कालावधीत ते 568 कोटी रुपये होते.

टिव्हीएसने डिसेंबर तिमाहीसाठी कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 10.1 टक्के नोंदवले, तर 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन 10 टक्के होते. बैठकीत, मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 5 रुपये, 500 टक्के  अंतरिम लाभांश जाहीर केला, ज्यामुळे 238 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली. कंपनीने सांगितले की या पेमेंटची रेकॉर्ड डेट 2 फेब्रुवारी 2023 असेल.

टिव्हीएस मोटर्सने तिसऱ्या तिमाहीत एकूण 8.36 लाख दुचाकींची विक्री नोंदवली. तर, वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ते 8.35 लाख युनिट होते. दुचाकी निर्यात विक्री डिसेंबर 2021 मध्ये 2.53 लाख युनिट्सच्या तुलनेत 2.07 लाख युनिट्स इतकी नोंदवली गेली आहे. या तिमाहीत तीनचाकी वाहनांची विक्री 0.43 लाख युनिट होती, जी गेल्या वर्षी  0.44 लाख युनिट होती. आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत टिव्हीसीने 0.29 लाख युनिट्सची इलेक्ट्रिक वाहन विक्री नोंदवली आहे.