Tunisha Sharma Case: टी.व्ही इंडस्ट्री क्षेत्रातील नामांकित अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने काल आत्महत्या केली. तिने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. या अभिनेत्रीने अगदी कमी वयात हे टोकाचे पाऊल उचलले आहे. वय जरी लहान असले, तरी तिने पैसा अफाट कमविला आहे. तिने मागे सोडलेल्या या संपत्तीवर एक नजर टाकू.
तुनिषा शर्मा कुटुंब
अभिनेत्री तुनिषा शर्मा ही मूळची चंदीगडची आहे. काही वर्षांपूर्वींच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिच्या मागे आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे. तिचे शालेय शिक्षणदेखील चंदीगड येथे पूर्ण झाले आहे. अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी ती मुंबई येथे आली होती. अभिनय क्षेत्रात यशाच्या मार्गावर असलेल्या या अभिनेत्रीने आत्महत्या केल्यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे.
किती आहे संपत्ती?
अभिनेत्री तुनिषा शर्माने भारत का ‘वीर पुत्र-महाराणा प्रताप’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच तिने ‘फितूर’, ‘बार-बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा राणी सिंह’, ‘दबंग 3’ या चित्रपटांमध्येदेखील काम केले होते. फितूर व बार-बार देखो या चित्रपटांमध्ये तिने तरूण कतरिना कैफची भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट यांच्यानुसार, तुनिषा शर्मा हिने 2 मिलियन डॉलर म्हणजेच साधारण 15 कोटी रूपयांची संपत्ती मागे सोडून गेली आहे.
का केली आत्महत्या?
तुनिषा शर्माने सहकलाकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तसेच ती मागील काही दिवसांपासून नैराश्यात होती. प्रेस जर्नल ने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुनिषा गर्भवती होती व तिच्या बॉयफ्रेंडने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली.