Toyota Innova Hycross: टोयोटा कंपनीने 2023 ची वाट न पाहता 2022 हे वर्ष संपायला अवघे 4 दिवस शिल्लक असताना कारच्या मार्केटमध्ये आपली नवीन कार लॉन्च केली. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) ही ती कार असून या कारमध्ये 8 जण बसू शकतात. कंपनीने याची कुणकुण नोव्हेंबरमध्येच दिली होती. कंपनीने बुधवारी याची किंमत अधिकृत जाहीर केली. याची बेसिक किंमत 18.30 लाख रुपयापासून (एक्स शोरूम) सुरू होते आणि याचे टॉप मॉडेल 28.97 लाख रुपयांना (एक्स शोरूम) (Toyota Innova Hycross Price in India 2022) उपलब्ध आहे.
टोयोटाची ही नवीन इनोव्हा कार त्याच्या आधीच्या कारपेक्षा 5 लाख रुपयांनी स्वस्त आहे. एक्स शोरूम दिल्लीच्या किमतीनुसार याची किंमत 18.30 पासून 28.97 लाख रुपये यादरम्यान असणार आहे. ही कार नॉन-हायब्रिड आणि स्ट्राँग-हायब्रिड या पर्यायांहस उपलब्ध आहे. तसेच ही कार G, GX, VX, ZX आणि ZX (O) या पाच प्रकारांमध्ये (Innova Hycross Models) उपलब्ध आहे. प्रत्येक प्रकारात थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे फीचर्स उपलब्ध आहेत.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसमध्ये खास काय आहे?
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस कारमधील इंटेरिअरबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये 7 इंचाचा डिजिटल ड्राईव्ह डिस्प्ले आणि 10 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली. ही सिस्टिम वायरलेस असून अण्ड्रॉईड ऑटो आणि अपल कारप्लेला सपोर्ट करणारी आहे. यात जेबीएल साऊंड सिस्टिम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, अडजेस्टेबल सीट्स, ड्युअल 10 इंचाची रिअर टचस्क्रीन सिस्टम आणि सनरूफ अशा गोष्टी दिल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्स दिल्या आहेत.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे हायब्रिड मॉडेल
ही कार पावरट्रेन ऑप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात पेट्रोल, पेट्रोल + हायब्रिड असे पर्याय देऊन लॉन्च करण्यात आले आहे. G आणि GX प्रकारच्या मॉडेलमध्ये पेट्रोल इंजिन असणार आहे आणि याचे इतर 3 प्रकार ZX (O), ZX आणि VX या मॉडेलमध्ये सेल्फ चार्जिंगची सुविधा (Innova Hycross Variants Explained) देण्यात आली. तसेच यामध्ये 7 आणि 8 प्रवासी सीट असा पर्यायही देण्यात आला आहे.
इंजिन आणि मायलेजची क्षमता
टोयोटा हायक्रॉस मॉडेल दोन पॉवरट्रेनसह लॉन्च करण्यात आली. याचे पहिले इंजिन 2.0 लीटरच्या क्षमतेचे आहे; जे 174PS पॉवर आणि 205Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. दुसरे इंजिन 2.0 लीटरचे असून हे स्ट्रॉन हायब्रिड इंजिन आहे. हे 113PS मोटारच्या सहाय्याने 152PS पॉवर आणि 187Nm टॉर्क जनरेट करते. या गाडीचे मायलेज 21.1 किलोमीटर प्रति तास (Innova Hycross Mileage Diesel) इतका असल्याचा दावा कंपनी करते.