Best Small Cap Mutual Funds: म्युच्युअल फंडातील भारतीयांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक गुंतवणूक योजनांमधून निश्चित परतावा मिळतो मात्र, हा परतावा आकर्षक नसतो जेमतेम महागाई दरापेक्षा किंचित जास्त परतावा मिळतो. त्यामानाने म्युच्युअल फंडातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. मात्र, मग जोखीमही स्वीकारावी लागते. स्मॉल कॅप म्हणजेच कमी भांडवल असणाऱ्या कंपन्यांमधील गुंतवणुकीत जोखीम जास्त असते. त्याचबरोबर जास्त परतावा मिळण्याची शक्यताही वाढते.
मागील एक वर्षाच्या कालावधीत कोणत्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांनी किती परतावा दिला हे आपण पाहूया. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार काही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी 20% ते 33% पर्यंत भरघोस परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. (Best Small Cap Mutual Funds list) दरम्यान, ज्या योजनांनी जास्त परतावा दिला आहे त्या योजना भविष्यातही चांगला परतावा देतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
एचडीएफसी स्मॉल कॅप फंड (HDFC Small Cap Fund)
एचडीएफसी स्मॉल कॅप फंड या योजनेने डायरेक्ट प्लॅनद्वारे 33.16% परतावा दिला. तर रेग्युलर योजनेतून 31.87% परतावा मागील एक वर्षात मिळाला. ही योजना S&P BSE 250 SmallCap टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड (Franklin India Smaller Companies Fund)
फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडच्या डायरेक्ट प्लॅनद्वारे 30.13% परतावा गुंतवणूकदारांना मिळाला. तर रेग्युरल प्लॅनद्वारे 29.04% इतका परतावा मिळाला. हा फंड NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund)
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनद्वारे 27.58% परतावा मिळाला. तर रेग्युलर प्लॅनद्वारे 26.44% परतावा मागील एक वर्षात मिळाला. हा फंड NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
टाटा स्मॉल कॅप फंड (Tata Small Cap Fund)
टाटा स्मॉल कॅप फडंच्या डायरेक्ट प्लॅनमधून मागील एक वर्षात 28.09% इतका परतावा मिळाला तर रेग्युलर योजनेतून 25.71% परतावा मिळाला. हा फंड NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund)
क्वांट स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट प्लॅनमधून मागील एक वर्षात 27.11% परतावा मिळाला. तर रेग्युलर योजनेमधून 25.33% रिटर्न्स मिळाले. ही योजना NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
अॅक्सिस स्मॉल कॅप फंड (Axis Small Cap Fund)
डायरेक्ट प्लॅन ऑफ अॅक्सिस स्मॉल कॅप फंडने मागील वर्षभरात 20.04% परतावा दिला तर रेग्युलर प्लॅनने 18.49% परतावा दिला. हा फंड NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड (Bank of India Small Cap Fund)
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड या योजनेने डायरेक्ट प्लॅनद्वारे मागील एक वर्षात 20.40% परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनने 18.32% परतावा दिला. हा फंड NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
एडलवाइज स्मॉल कॅप फंड (Edelweiss Small Cap Fund)
एडलवाइज स्मॉल कॅप फंडने डायरेक्ट प्लॅनद्वारे 21.62% परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनने 19.64% परतावा दिला. हा फंड NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)