Small Cap Mutual Fund: मागील काही वर्षात म्युच्युअल फंडांतील भारतीयांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात काही स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांनी मागील वर्षभरात सरासरी 40% पर्यंत परतावा दिला आहे. डायरेक्ट आणि रेग्युलर अशा दोन्ही प्रकारच्या योजनांनी गुंतवणूकदारांना फायदा करून दिला आहे. एका योजनेने सर्वाधिक 49% परतावा दिला आहे.
स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय?
सर्वप्रथम हे जाणून घेऊया स्मॉल कॅप फंड म्हणजे काय? स्मॉल कॅप म्हणजे कमी भांडवलामधील कंपन्या. येथे कॅप म्हणजे कॅपिटल (भांडवल) असा अर्थ आहे. फंड मॅनेजर अशा लहान कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात ज्या तेजीच्या मार्गावर आहेत आणि भविष्यात आणखी प्रगती करू शकतात. आर्थिक स्थिती भक्कम असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक केली जाते. भविष्यात वाढीसाठी मोठी संधी असल्याने या योजनांमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यताही वाढते. अर्थात जास्त परतावा म्हणजे जास्त जोखीम.
स्मॉल कॅप कंपन्या अर्थव्यवस्थेतील मोठ्या घडामोडी, सरकारी निर्णय बदल, मागणी पुरवठ्यातील अचानक बदल यामुळे अचानक खालीही जाऊ शकतात. अशा वेळी गुंतवणूकदाराचे मोठे नुकसान होऊ शकते. ज्यांना दीर्घकाळ 5-7 वर्ष गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हे फंड चांगले समजले जातात. तसेच या फंडमध्ये जोखीमही जास्त असते.
मागील वर्षभरात सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनांची माहिती (जून 2017 पर्यंत) असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड संस्थेच्या संकेतस्थळावर दिली आहे. (Top performing small cap mutual fund) मागील वर्षभरात या योजनांनी जरी चांगला परतावा दिला असला तरी भविष्यात असाच परतावा देतील याची शक्यता नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पाहूया पाच बेस्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स.
एचडीएफसी स्मॉल कॅप फंड
एचडीएफसीच्या स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट योजनेतून मागील वर्षभरात 48.84% परतावा मिळाला. (Top small cap mutual fund) तर रेग्युलर योजनेतून 47.39% परतावा मिळाला. ही योजना S&P BSE 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे. स्मॉल कॅप योजनांमध्ये या योजनेचा परतावा सर्वाधिक आहे.
फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड
फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडच्या डायरेक्ट योजनेतील गुंतवणुकीने मागील वर्षभरात 44.28% परतावा दिला आहे. तर रेग्युलर योजनेने 43.06% परतावा दिला आहे. ही योजना NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड
निप्पॉन इंडिया फंडच्या डायरेक्ट प्लॅनने मागील वर्षभरात 42.89% परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनने 41.61 टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी स्मॉल कॅप 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
क्वांट स्मॉल कॅप फंड
क्वांट स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट योजनेने मागील एक वर्षात 44.40% परतावा दिला. तर रेग्युलर योजनेने 42.41% परतावा दिला. ही योजना NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
टाटा स्मॉल कॅप फंड
टाटा स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट योजनेने मागील वर्षभरात 41.96% परतावा दिला. तर रेग्युलर योजनेने 39.34% परतावा दिला. ही योजना NIFTY Smallcap 250 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)