Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Midcap Mutual Funds: गुंतवणूकदारांच्या फायद्याचे टॉप 5 मिडकॅप फंड, 10000 रुपयांच्या एसआयपीनं केले 32 लाख!

Best Midcap Mutual Funds: गुंतवणूकदारांच्या फायद्याचे टॉप 5 मिडकॅप फंड, 10000 रुपयांच्या एसआयपीनं केले 32 लाख!

Image Source : www.economictimes.indiatimes.com

Best Midcap Mutual Funds: गुंतवणूकदारांच्या फायद्याचे मिडकॅप फंड सध्या चांगल्या प्रतिसादात सुरू आहेत. मिडकॅप इंडेक्समध्ये जबरदस्त अ‍ॅक्टिव्हिटी दिसून येत आहेत. सध्या ती 36 हजारांच्या पुढे आहे. निफ्टी मिडकॅप 100नं गेल्या 3 महिन्यांत सुमारे 20 टक्के आणि या वर्षी आतापर्यंत 15 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

मिडकॅप म्युच्युअल फंड (Midcap Mutual Funds) गुंतवणूकदारांना बाजारातल्या या परिस्थितीचा फायदा होत आहे. मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर चांगल्या स्थितीत आहेत आणि भांडवली खर्चाचे (Capital expenditure) फायदे मिळत आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे. झी बिझनेसनं याचा आढावा घेतला आहे.

दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक फायद्याची

वाइज इन्व्हेस्टचे सीईओ हेमंत रुस्तगी आणि मनीफ्रंटचे सीईओ मोहित गँग यांनी याबद्दल सांगितलं आहे. मिडकॅप फंड प्रकार हा प्रचंड अस्थिरतेचा आहे. अशावेळी गुंतवणूकदारांनी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी. परतावा 10-15 वर्षांत काही पटींनी होतो. गुंतवणूकदारांनीदेखील जोखीम घेण्याची क्षमता लक्षात ठेवायला हवी. 10 वर्षांच्या कालावधीत मिडकॅप म्युच्युअल फंड प्रकारतले उत्कृष्ट कामगिरी करणारे फंड कोणते, ते जाणून घेऊ...

टॉप 5 मिडकॅप फंड

  1. कोटक इमर्जिंग इक्विटी फंड (Kotak Emerging Equity Fund)
  2. एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड (HDFC Mid-Cap Opportunities Fund)
  3. एडलवाइस मिड कॅप फंड (Edelweiss Mid Cap Fund)
  4. एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड (SBI Magnum Midcap Fund)
  5. यूटीआय मिड कॅप फंड (UTI Mid Cap Fund)

(टीप- 6 जुलै रोजी आधारित डेटा. स्रोत - AMFI)

वरच्या यादीतले सर्व मिडकॅप फंड निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला फॉलो करतात. या फंडांनी दहा वर्षांत सरासरी 20-22 टक्के परतावा दिला आहे. कोटक इमर्जिंग इक्विटी फंडानं सर्वाधिक परतावा दिला आहे. त्यानंतर एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंडानं परतावा दिला आहे.

10 हजारांच्या एसआयपीनं केले 32 लाख

एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाची एनएव्ही सुमारे 121 रुपयांची आहे. फंडाचा आकार 39295 कोटी रुपये आहे. खर्चाचं प्रमाण 1.58 टक्के आहे. कॅटेगरीच्या अ‍ॅव्हरेजपेक्षा ते कमी आहे. या फंडानं 10 वर्षांत एसआयपी गुंतवणूकदारांना सरासरी 18.81 टक्के परतावा दिला आहे. या एकूण कालावधीत एकरकमी गुंतवणूकदारांना सरासरी 21.43 टक्के इतका परतावा मिळाला. जर एखाद्या गुंतवणूकदारानं 10 वर्षांपूर्वी या मिडकॅप फंडात 10000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर त्याचं मूल्य आज 32.3 लाख रुपये इतकं झालं असतं. गुंतवणुकीची एकूण रक्कम 12 लाख रुपये झाली असती. तर निव्वळ परतावा 170 टक्के आहे.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)