वर्ष 2023 मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसासाठी लार्ज कॅप आणि मिडकॅप इक्विटी फंड चांगला पर्याय ठरु शकतो. आयसीआयसीआय डायरेक्ट या ब्रोकिंग संस्थेने वर्ष 2023 साठी लार्जकॅप आणि मिडकॅप इक्विटी म्युच्युअल फंडांची शिफारस केली आहे. हे फंड चालू वर्षात चांगला परतावा देतील, असा दावा कंपनीने केला आहे.
लार्ज कॅप किंवा मिडकॅप इक्विटी म्युच्युअल फंड हे नावाप्रमाणेच आकाराने मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. मध्यम आकारातील कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील फंडांकडून गुंतवणूक केली जाते. भारतातील आघाडीच्या 200 कंपन्यांचा लार्जकॅप आणि मिडकॅप स्टॉक्सच्या श्रेणीत समावेश होतो. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या कंपन्या निर्यातील मोठा वाटा उचलतात. आर्थिक पाळेमुळे मजबूत असल्याने लार्जकॅप शेअर्सवर शेअर बाजारातील अस्थिरतेचा फारसा परिणाम जाणवत नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडांकडून लार्जकॅप आणि मिडकॅप इक्विटी फंड योजनांचा पर्याय दिला जातो.
दिर्घकाळात कमी जोखमीच्या आधारे संपत्ती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या गुंतणूकादारांना लार्ज कॅप आणि मिडकॅप इक्विटी म्युच्युअल फंड चांगला पर्याय ठरु शकतात. सेबीच्या नियमानुसार या इक्विटी फंडांमधील किमान 35% निधी हा लार्ज आणि मिडकॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. योजनेतील जोखीम कमी करण्यासाठी फंडांकडून लार्ज कॅपसोबत मिडकॅपचा योग्य समतोल राखला होता. ज्यांना कमी जोखीम घ्यायची आहे त्यांच्यासाठी मिडकॅप इक्विटी म्युच्युअल फंडांची शिफारस फंड कंपन्यांकडून केली जाते.
फंड | क्रिसिल मानांकन | 1 वर्षातला परतावा | 2 वर्षातला परतावा | 3 वर्षातला परतावा | 5 वर्षातला परतावा |
Axis Growth Opportunities Fund | -- | -6.38% | 2.23% | 14.62% | -- |
HDFC Large and Midcap Fund | 4-Star | 12.08% | 14.25% | 24.04% | 18.63% |
ICICI Pru Large and Midcap Fund | 5-Star | 16.14% | 18.02% | 26.40% | 20.02% |
Kotak Equity Opportunities Fund | 3-Star | 11.37% | 12.03% | 20.02% | 17.73% |
SBI Large and Midcap Fund | 5-Star | 12.36% | 14.38% | 23.29% | 18.85% |
Sundaram Large and Midcap Fund | 3-Star | 5.33% | 9.24% | 18.31% | 15.58% |