Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 5 Corporate Deals 2022: जगातील सर्वात मोठया पाच बिझनेस डील्स, भारतातील एका डील्सचा समावेश

Top 5 Corporate Deals 2022

Top 5 Corporate Deals 2022: जगात अनेक पातळीवर मोठ-मोठया डिल्स होतात. 2022 या वर्षी आर्थिक धोरणे, रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोनामुळे जगभरातील व्यवसायावर परिणाम झाला. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण करार (डील्स) झाल्या आहेत. या वर्षातील सर्वात मोठ्या डील्सबाबत आपण जाणून घेऊयात.

Top 5 Corporate Deals 2022: जगातील महामारी आणखीदेखील पूर्णपणे संपली नाही.  याचा आर्थिक स्थितीवर काही परिणाम झाला आहे. पण या परिस्थितीत ही जगातील सर्वात मोठे पाच बिझनेस डील्स झाल्या आहेत. या डील्समध्ये भारताचादेखील समावेश आहे. प्रत्यक्षात या कोणत्या बिझनेस डील्स आहेत, ते जाणून घेऊयात. 

Amgen-Horizon Therapeutics Deal

बॉयोटक ड्रग डेवलसंबंधित एमजेन ही दुर्लभ आजारसंबंधित सेग्मेंटमध्ये आपला विस्तार निर्माण करीत आहे. या अंतर्गत कंपनीने 12 डिसेंबर 2022 ला मेडिसिन कंपनी थेरेप्युटिक्स (Horizon Therapeutics) ला खरेदी करण्याचा करार (डील) केला आहे. या डील्सची किंमत 2640 करोड डॉलर आहे व हा यावर्षीचा पाचवा सर्वात मोठा करार आहे. होरिजोनला प्रति शेयर 116.50 डॉलर मिळणार. 

Elon Musk – Twitter Deal

इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणारी दिग्गज कंपनी टेस्ला (Tesla) व स्पेस कंपनी स्पेसएक्स (Spacex) चे मालक एलान मस्क (Elon Musk) ने ट्विटर खरेदी केले आहे. 25 एप्रिल 2022 रोजी ही डील 4400 करोड डॉलर मध्ये झाली. यावर्षीची ही तिसरी सर्वात मोठी डील आहे. 

Broadcom-VMware Deal

2022 ची जगातील सर्वात मोठी दुसरी डील अमेरिकाची चीप बनविणारी कपंनी ब्रॉडकॉम (Broadcom) व अमेरिका व्काउंड कंप्यूटिंग व वर्चुअल इजेशन कंपनी वीएमवेयर (VMware) यांच्यातील आहे. 6100 करोड डॉलरमध्ये या दोन कंपन्यांमध्ये करार करण्यात आला आहे. 

Microsoft-Activision Blizzard Deal

यावर्षीची सर्वात मोठी डील मायक्रोसॉफ्टव एक्टिवेशन ब्लिजार्ड यांच्यामध्ये झाली. 6870 करोड डॉलरमध्ये हा करार 18 जानेवारी 2022 मध्ये झाला. मायक्रोसॉफ्टने एक्टिवेशन ब्लिजार्डला 95 डॉलर प्रति शेयरच्या दराने कॅशच्या स्वरूपात खरेदी केले. या कराराच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टने गेमिंग मार्केटमध्ये प्रवेश केला व रेवेन्यूमध्ये टेनसेंट (Tencent) व सोनी ( Sony) नंतर गेमिंगमध्ये जगातील सर्वात मोठी तिसरी कंपनी ठरली.  

HDFC Bank – HDFC Deal

2022 यावर्षीच्या जगातील सर्वात मोठया पाच डील्समध्ये भारताचादेखील समावेश आहे. एचडीएफसी व एचडीएफसी बॅंकचे विलिन होणे बाकी आहे. 4 हजार करोड डॉलरचा हा करार यावर्षीचा चौथा सर्वात मोठा करार आहे. भारतीय इतिहासात आतापर्यंतची ही सर्वात मोठी डील आहे. 4 एप्रिल 2022 ला हा करण्यात आला होता.