Perfect Saving Plans : आपल्या सर्वांचे जीवन अनेक अनिश्चित गोष्टींनी भरले आहे. कुणाही सोबत कोणतीही घटना कधीही घडू शकते. एखादी वेळेस आपली नोकरी जाऊ शकते. एखाद्यास हॉस्पीटल मध्ये अचानक भरती करावे लागू शकते. किंवा अचानक एखाद्या मोठ्या रकमेची आवश्यक्ता भासु शकते. या सर्व परिस्थितीला पूढे जाण्यासाठी आपली बचत, गुंतवणुक आपल्या जवळ असणे आवश्यक असते. यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत की, अश्या कुठल्या दीर्घकालीन योजना आहेत. ज्या आपल्या अडचणीच्या वेळी आपल्या उपयोगी पडू शकतात.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund)
पीपीएफ बचत आणि गुंतवणुकीचा एक अतिशय लोकप्रिय मार्ग आहे. याला भारत सरकारचा पाठिंबा आहे आणि त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो जोखीममुक्त आहे, तसेच परताव्याची हमी देतो. ही योजना तिच्यावर मिळणाऱ्या कर लाभांसाठी देखील ओळखली जाते. या योजनेत तुमची गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. विशेष म्हणजे तुम्ही तुमची गुंतवणूक 500 रुपयांपासून सुरू करू शकता.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate)
सरकार समर्थित गुंतवणूक योजना एनएससी ही एक कर बचत योजना आहे, जी कोणत्याही पोस्ट ऑफिस, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि अधिकृत खाजगी बँकेद्वारे सहज मिळवता येते. ही एक पारंपारिक गुंतवणूक मानली जाते, जिथे जोखीम खूप कमी असते. यामध्ये तुम्ही केवळ 1000 रुपयां पासुन गुंतवणुक करु शकता. यामध्ये, गुंतवणूकदाराला कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते. त्यामुळे जर तुम्ही निश्चित उत्पन्नाच्या शोधात असाल आणि कमी जोखीम पत्करून स्थिर आणि खात्रीशीर परतावा मिळवू इच्छित असाल, तर ही योजना तुमच्यासाठी अधिक चांगली ठरू शकते.
बचत विमा योजना (Savings Insurance Plan)
तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीला स्थिर परतावा (मॅच्युरिटीची रक्कम) मिळवायचा असेल तर, बचत विमा योजना तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. ही एक प्रकारची जीवन विमा योजना आहे. जिथे पॉलिसी धारकाला बचत आणि गुंतवणूक दोन्हीचा पर्याय मिळतो. याद्वारे एखादी व्यक्ती स्वत:ला आणि कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवू शकते. ही योजना शिस्तबद्ध बचतीला चालना देण्यासाठी, स्थिर परतावा ऑफर करण्यासाठी मदत करेल. तसेच यामुळे तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास देखील मदत होईल. अश्या प्रकारे बचत करुन तुम्ही तुमचं भविष्य उज्वल आणि सुरक्षित करु शकता.