आज सोमवारी 14 नोव्हेंबर 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 52,560 रुपये इतका झाला. मागील शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅमसाठी 52,281 इतका होती. शुक्रवारच्या तुलनेत आज सोनं 279 रुपयांनी महाग झालं आहे. त्याचप्रमाणे आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,350 इतका नोंदवण्यात आला आहे. हा दर 10 ग्रॅम सोन्यासाठी लिस्ट करण्यात आला आहे. शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 52,072 नोंदवण्यात आला. शुक्रवारच्या तुलनेत आज 22 कॅरेट सोनं 278 रुपयांनी महाग झालं आहे.
त्याचबरोबर 916 शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 48,145 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. हा दर 10 ग्रॅम सोन्यासाठी लिस्ट करण्यात आला आहे. शुक्रवारच्या तुलनेत 916 शुद्धतेच्या सोन्याचा भाव हा 256 रुपयांनी महागला आहे. शुक्रवारी बाजारात 916 शुद्धतेच्या सोन्यासाठी 47,889 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आला.
750 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत आज 39,420 एवढी नोंदवण्यात आली. हा दर 10 ग्रॅम सोन्यासाठी नोंदवण्यात आला. शुक्रवारच्या तुलनेत 750 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 209 रुपयांनी वाढला आहे. शुक्रवारी 750 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत 39,211 प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आली होती.
चांदी किती रुपयांनी महागली? (Today’s Silver Rate)
आज, सोमवारी जारी करण्यात आलेल्या नव्या अपडेटनुसार, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी 1 किलो चांदी 61,354 रुपयांवर होती, तर आज बाजार 1 किलो चांदीसाठी 61,500 रुपयांवर उघडला. चांदीच्या दरात 146 रुपयांची वाढ झाल्याचे दिसते.