भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीच्या दरात घसरण झालेली बघायला मिळाली. आज बाजार बंद होताना दर काय होते ते सविस्तर जाणून घेऊया.
या आठवड्याच्या सुरुवातीलाच पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली. मात्र, चांदीच्या दरात घसरण होताना दिसून आली. 24 कॅरेट 10 ग्रॅम इतक्या सोन्याच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली. आता हा दर 54 हजार 760 रुपये इतका झाला आहे.
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 50 हजार 197 रुपये, 20 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 633 रुपये, 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 41 हजार 70 इतका राहीला आहे. 16 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 36 हजार 507 रुपये, 14 कॅरेट सोन्याचा दर 31 हजार 943 रुपये, 12 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 27 हजार 380 रुपये, 10 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 22 हजार 817 रुपये इतका राहिला आहे. हा या कॅलेंडर वर्षातील शेवटचा आठवडा आहे. आठवड्याची पहिल्या दिवसाची सुरुवात सोन्याच्या किमतीत वाढ होऊन झाली आहे.
चांदीच्या दरात घसरण (silver rate)
आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दरात वाढ होताना चांदीच्या दरात मात्र घसरण झालेली बघायला मिळाली. चांदीच्या दरात किलोमागे 30 रुपयांची घसरण झाली 0.040 टक्के इतके हे दर कमी झाले. बाजार बंद होताना एक किलो चांदीची किमत 69 हजार 10 रुपये इतकी आहे.