Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अटल पेन्शन योजना सुरू करण्याचा आज शेवटचा दिवस!

Income-tax payer not be to join APY

Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा टॅक्स धारकांना आज (दि.30 सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे खाते सुरू करण्याचे टप्पे आणि फायदे जाणून घ्या!

1 ऑक्टोबर, 2022 पासून जे नागरिक टॅक्स भरतात किंवा ज्यांना टॅक्स लागू होतो. त्यांना अटल पेन्शन योजनेचा (Atal Pension Yojana) लाभ मिळणार नाही, असं केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ऑगस्टच्या एका नोटीफिकेशनद्वारे स्पष्ट केलं होतं. त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे ज्यांना टॅक्स लागू होतो त्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते आज दिवसभरात घेऊ शकतात.

अटल पेन्शन योजना ही मे 2015 मध्ये केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेत सहभागी होण्याचा आज शेवटचा दिवस आहे. म्हणजे जे टॅक्स भरतात किंवा ज्यांना टॅक्स लागू होतो, त्यांच्यासाठी या योजनेत सहभागी होण्याचा शेवटचा दिवस आहे. पण एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 1 ऑक्टोबरपर्यंत करपात्र नाही; पण त्याच्या पुढच्या महिन्यापासून त्याच्या उत्पन्नात वाढ झाली किंवा तो इन्कम टॅक्स कायद्यानुसार टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर त्या दिवसापासून त्या व्यक्तीचे अटल पेन्शन योजनेचे खाते बंद करून त्या खात्यात जमा झालेली रक्कम संबंधिताला दिली जाईल.

अटल पेन्शन योजना कशी सुरू करता येईल?

18 ते 40 वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सहभागी होता येते. ही योजना सुरू करताना अर्जदाराला जोडीदाराचा तपशील आणि नॉमिनेशन देणं बंधनकारक (Spouse Details and Nominee Name is Mandatory) आहे.

अटल पेन्शन योजनेविषयी महत्त्वाचे!

  • तुमचे बचत खाते (Saving Bank Account) असलेल्या बॅंकेच्या शाखेत जा आणि अटल पेन्शन योजनेचा फॉर्म (Atal Pension Yojana Form)  भरा.
  • बॅंक खात्याची संपूर्ण माहिती, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर अशी आवश्यक माहिती जमा करा. या योजनेसाठी केवायसी बंधनकारक (KYC Mandatory for Scheme) आहे. केवायसीसाठी बॅंक तुमच्याकडून आधार कार्डची माहिती मागू शकते.
  • अटल पेन्शन योजनेचे खाते सुरू झाल्यावर त्यात रक्कम टाकण्यासाठी तुमच्या बचत खात्यात पुरेशी रक्कम आहे का, याची खात्री करून घ्या.
  • एकावेळी एकच व्यक्ती अटल पेन्शन योजनेचे खाते सुरू कऱू शकते.


अटल पेन्शन योजनेचे फायदे (Benefits of Atal Pension Yojana)

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू केलेली अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) नागरिकांना निवृत्तीनंतर किंवा ते त्यानंतरही काम करत असतील तर त्यांना प्रत्येक महिन्याला पेन्शन स्वरूपात ठराविक रक्कम मिळवून देते. पेन्शन मिळण्यासाठी अपेक्षित असलेली किमान रक्कम जर एखाद्या व्यक्तीची जमा झाली नसेल तर सरकार ती कमतरता भरून काढून त्या व्यक्तीला पेन्शन मिळेल यादृष्टिने प्रयत्न करते.