Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Facebook Day: सोशल मिडियाचे व्यसन लावणाऱ्या फेसबुकचा थक्क करणारा व्यावसायिक प्रवास

Facebook Day

Facebook Day: आज, 4 फेब्रुवारी याच दिवशी 2004 साली आपल्या आवडत्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली. फेसबूकने आपल्याला सोशल मिडिया काय आहे, ते प्रभावीपणे कसे वापरायचे हे शिकवले. त्याचे आपल्याला व्यसनही लागले पण त्याच्याशी नाते जुळले आहे. आज फेसबूकच्या स्थापना दिनानिमित्त आपण फेसबूकच्या थक्क करणाऱ्या प्रवासाला उजाळा देऊया.

Facebook Day: इंस्टाग्रॅम (Instagram), विचॅट (WeChat), स्नॅपचॅट (SnapChat), टेलिग्रॅम (Telegram), ट्विटर (Twitter), टिंडर (Tinder), मोज (Moj), लिंक्डइन (LinkedIn), व्हॉट्सअॅप (WhatsApp) अशा असंख्य ऑनलाईन कनेक्टिव्हीटी प्लॅटफॉर्मच्या गर्दीत, आजही सोशल मिडिया (Social Media) म्हणजे फेसबूक (Facebook) हे समीकरण बदलेले नाही. फेसबूक कंपनीचे तोट्यात आहे, शेअर्स घसरत आहेत, कर्मचारी कपात होत आहे असे सर्व असले, यावरुन कंपनीची उलट-सुलट चर्चा होत असली तरी फेसबूकची जादू अजुनही कमी झालेली नाही. भारतात तर फेसबूकवर वेळ घालवल्याशिवया, अनेकांचा दिवस पू्र्ण होत नाही. आज फेसबूकला 19 वर्षे होत हेत, एक कम्युनिकेशन वेबसाईट मल्टीनॅशनल कंपनी बनली आहे आणि नागरिकांच्या जीवनातला महत्त्वाचा हिस्साही झाली आहे.

फेसबूक 4 फेब्रुवारी 2004 रोजी सुरू झाले, ते हार्वर्डच्या हॉस्टेलमध्ये (Harvard University). 19 वर्षाच्या मार्क झुकबर्गने (Mark Zuckerberg) त्याचे मित्र एडुआर्दो सँवेरीन, क्रिस ह्युजेस आणि डस्टीन मॉस्कोविटज यांच्यासोबत द फेसबूक डॉ कॉम (thefacebook.com) ही वेबसाईट सुरू केली. झुकबर्गला कनेक्शन या सिनियर्सच्या प्रोजेक्टवरुन फेसबूक सुरू करण्याची कल्पना सुचली होती खरी, मात्र अशाप्रकारचे काहितरी सुरू करावे हे त्याच्या डोक्यात 2003 पासून घोळत होते, तेव्हा त्याने फेसमॅश सुरू केलेही होते. फेसमॅशद्वारे विद्यापीठातील घडामोडी एकमेकांना सांगण्यासाठी तसेच त्यावर समस्या सांगून त्यावर चर्चा करण्यासाठी आणि विद्यापीठातील धोरणांवर व्होट देऊन त्या आवडतात की नाही याबाबत मत व्यक्त करण्यासाठीचा तो प्लॅटफॉर्म होता, ही वेबसाईट सुरू होऊन ती दोन दिवसात बंद करावी लागली होती.  

मग जन्म झाला फेसबूकचा, त्यावेळी ही वेबसाईट केवळ त्याच्या विद्यापीठातील मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी, फोटो शेअर शेअर करण्यासाठी बनवण्यात आली होती. फेब्रुवारी ते जून 2004 मध्ये वेबसाईट फक्त प्रायोगिक तत्त्वावर सुरू होती. मात्र पहिल्याच दिवशी त्यावर 1 हजार जणांनी रजिस्ट्रेशन केले होते. पुढे, कालांतरांने इतर कॉलेज, विद्यापीठातील विद्यार्थी या वेबसाईटचा भाग बनले. 2005 पर्यंत फेसबूकचे 1 लाख युजर्स झाले होते. मुळात त्यावेळी अॅडव्हान्स कोडिंग, प्रोग्रॅमिंग, सॉफ्टवेअर डेव्हल्प केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते, तसेच याला अॅडव्हान्स कम्युनिकेशन टुलही म्हटले गेले होते.

आजच्या फेसबूकमध्ये अनेक बदल झाले आहेत. आता फेसबूक केवळ विविध व्यक्तींशी कनेक्ट होण्याचे, संवाद साधण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर एक महत्त्वाचे बिझनेस टूलही बनले आहे. मात्र, 2004 चा विचार केला तर त्यावेळी फेसबूक हे एक एंगेजिंग माध्यम होते, त्यात लाईक, शेअर, कमेंट आणि टेक्स्टसोबत इमेज शेअर करण्याचे पर्याय होते, त्यावेळी असे पर्याय देणारा हा एकमेव सोशल मि़डिया प्लॅटफॉर्म होता आणि यामुळे प्रत्येकजण त्यात गुंतत असे, मोकळ्या वेळात कोण काय शेअर करत आहे, कोणी लाईक केले, काय कमेंट केली पाहण्यात वेळ घालवत असत.

फेसबुकची घोडदौड सुरू झाली (Facebook's journey to success began)

2005 नंतर तर फेसबुकला खऱ्य अर्थाने बूस्ट मिळाले.  टाईम मॅगझिनच्या माहितीनुसार, याच वर्षी  मार्क झुकबर्ग फेसबुकला गांभीर्याने घेत, व्यवसाय सुरू करण्यासाठी विद्यापीठातून बाहेर पडले. फेसबूकसाठी 12 लाख 7 हजार युएस डॉलरची इन्व्हेस्टमेंट मिळवली त्यातून कॅलिफोर्निया येथे ऑफिस थाटले. फेसबूकच्या टूल्समध्ये वेळोवेळी बदल करून त्याला अधिक एंगेजिंग बनवले आणि पारंपरिक मार्केटींग केली ज्यामुळे 2006 वर्षाच्या शेवटी 50 लाख युजर्स मिळाले.

फेसबूक येणारी गर्दी पाहून, झुकबर्ग फक्त खुश झाला नाही, तर त्याने विविध कंपन्यांशी वेंचर्स करायला सुरुवात केली. अनेक कंपन्यांनी यास चांगला प्रतिसाद दिला, तरुणांना आपल्या उत्पादनाकेड आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी फेसबूकवर आपल्या जाहिरात देण्यास सुरुवात केली. पुढे त्याने कंपन्यांसाठी विशिष्ट पेजची सुविधा उपलब्ध करून दिली. 2008 नंतर पेज, ग्रुप, पोक, आणि गेम सुरू केले. यासह यात 40 हून अधिक भाषा सामील केल्या गेल्या. ज्यामुळे एखादी व्यक्ती सहज तासभर किंवा त्याहून जास्तवेळ फेसबूकवर घालवू लागली.

2011 साली कंपनीने 1 अब्ज रुपये कमावले होते, 65 टक्क्यांनी नफा वाढला होता. यानंतरचा महत्त्वाचा टप्पा आला तो 18 मे 2012 रोजी, फेसबूकचा आयपीओ (IPO) बाजारात लाँच झाला. तंत्रज्ञान क्षेत्राच्या संपूर्ण इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ मानला जातो. याचे बाजार भांडवल 63.14 अब्ज युएस डॉलर एवढे होते. या शेअर्सद्वारे कंपनीला 16 अब्ज उभे करायचे होते. फेसबूकच्या आयपीओची किंमत 38 युएस डॉलर एवढी होती. त्यावेळी फेसबूकचे युजर्स 483 दशलक्ष होते, मात्र तरिही आयपीओमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. किंमत 18 युएस डॉलरवर आली आणि 57 टक्के शेअर्स विकले गेले. शेअर बाजारात फेसबूकच्या खराब कामगिरीचे मुख्य कारण सांगितले जाते की त्याचवेळी जनरल मोटर्सने फेसबुकला दिलेली जाहिरांतींची 10 दशलक्ष रुपयांची ऑर्डर मागे घेतली, त्यांनी फेसबूक अकार्यक्षम यावर जाहिराती करून फायदा नाही असे म्हणत जाहिराती बंद केल्या. ज्याचा परिणाम त्यावेळी आयपीओवर झाला, मात्र यावेळीही फेसबूक काही पडले नाही, कंपनी लिस्ट झालीच, ही माहिती फोर्ब्स मॅगझिनने 2008 साली प्रसिद्ध केली होती. आज फेब्रुवारी 2023 मध्ये फेसबूकचे मार्केट कॅप 562.19 बिलियन युएस डॉलर आहे. यामुळे फेसबुक ही मार्केट कॅपनुसार जगातील 7वी सर्वात मोठी कंपनी आहे.

अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फेसबूकने साध्य केल्या (Facebook has achieved the seemingly impossible)

2012 मध्ये मोठ्या कंपनीची जाहिरात गेल्यामुळे शेअर्सच्या किंमती खाली घसरल्या, ठरलेले उद्दीष्ट पूर्ण करता आले नाही याचा परिणाम रोजच्या व्यवसायावर झाला, नवे युजर्स येणे कमी झाले. मात्र, यावेळी झुकबर्ग आणि त्यांच्या टीमने जोमाने मेहनत घेतली, फेसबुकला अधिक अॅक्टीव्ह बनवण्यासाठी काही बदल केले, विविध देशांनुसार त्यात काही गोष्टी आणल्या. ज्यामुळे 2016 मध्ये 1 अब्ज डेली अॅक्टीव्ह युजर्सचा टप्पा गाठला, ही खूप मोठी अचिव्हमेंट मानली जाते. तर, फेसबूक युएसमधील प्रति व्यक्ती म्हणजे एका अॅक्टीव्ह युजरच्या मागे 4.08 युएस डॉलर कमावते, तर आशियात 0.69 युएस डॉलर कमावते, ही माहिती युएस बिझनेस इंन्साईडरने जानेवारी 2022 मध्ये प्रसिद्ध केली होती

2012 नंतर फेसबूकने मोठ्या प्रमाणात मोबाईलवर फोकस केले. येत्या काळात स्मार्टफोनचे वर्चस्व असणार हे लक्षात घेऊन मोबाईलनुसार फेसबूकमध्ये मॉडिफिकेशन केले गेले. प्रत्येक नव्या मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट फेसबूक असावे यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांशी टायअप केले. ज्यामुळे आपल्याला कधीच फेसबूक अॅप डाऊनलोड करावे लागले नाही. 2014 पर्यंत फेसबूक 61 टक्के मोबाईल जाहिराती घेऊ लागले. आज फेसबूक 90 टक्के मोबाईल जाहिराती घेत आहे, तसेच त्यांचे रेव्हेन्यू मॉडेलही बदलले आहे. 2021 मध्ये कंपनी 1 ट्रिलियन युएस डॉलर्सच्या कल्बमध्ये सामील झाली. हा आकडा गाठणारी युएसमधील ही पाचवी कंपनी ठरली, म्हणजे फेसबूक अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल यांच्या रांगेत विराजमान झाली.

फेसबूकचा डाऊनफॉल सुरू झालाय? (Facebook Downfall Begins?)

आज फेसबुकअंतर्गत इन्स्टाग्रॅम, व्हॉट्सअॅप, ऑक्युलस व्हिआर, मेसेंजर एवढ्या सोशल नेटवर्किंग कंपन्या आहेत. तर स्वत: फेसबूक मेटाच्या अंतर्गत कार्यरत आहे. 28 ऑक्टोबर 2021 रोजी मेटाव्हर्स व्हर्जन झुकबर्गने आणले आणि कंपनीचे नाव फेसबूकवरुन मेटा (Meta) असे केले. बिझनेस जगात चर्चा आहे की फेसबूकचा डाऊनफॉल सुरू झाला. आजकाल फेसबूक आवडत नाही, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर वेळ घालवायला आवडतो वैगरे मात्र तरिही 2022 मध्ये फेसबूकचे 2 अब्ज अॅक्टिव्ह युजर्स आहेत, जे 4 टक्क्यांनी वाढले आहेत. तर बिझनेस वाढवण्यासाठी, अनेक कंपन्या, लघुउद्योग, स्वत:ची इमेज बिल्ड कऱण्यासाठी राजकारणी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते सर्व जण फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यात जाहिरांतींचे मॉडेल बदलले आहे, अगदी 10 रुपयांपासून जाहिरात करता येते. पोस्ट बूस्ट, बॅनर, कॅम्पेन यासाठी फेसबूक मदतही करते आणि त्याचे पैसेही कमावते.
फेसबुकने 2022 वर्षात 120.18 अब्ज युएस डॉलरचा महसूल कमावला. कंपनीने 2.93 अब्ज युएस डॉलर 2021 च्या तुलनेत अधिक कमावले आहेत. सध्या शेअरची किंमत 196.64 युएस डॉलर आहे.

फेसबूक टिकणार की त्याचा मेकओव्हर होणार हे येणारा काळच सांगेल, पण आकडेवारीनुसार अजुनही फेसबूक धक्का बसलेला नाही.