Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मोफत एसटी प्रवास कोणाला लागू आहे? यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

Free ST Travelling

एसटी महामंडळाला (State Transport) महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांचा प्रवास घडवणारी ही एकमेव सेवा आहे. एसटी महामंडळाकडून संबंधित घटकांना 24 प्रकारच्या विविध सवलती दिल्या जातात.

एसटी महामंडळाला (State Transport) महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक वर्षांपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (State Transport Corporation) एसटी ही राज्यातील कानाकोपऱ्यात सार्वजनिक प्रवासासाठी कटिबद्ध आहे. एसटीशी आजही सर्वसामान्य नागरिकांची नाळ जोडली गेली. कित्येक दशकांपासून उन-वारा-पाऊस झेलत एसटी सर्वसामान्यांना त्यांच्या गावी/ठिकाणी सोडण्याचे काम अविरतपणे करत आहे.

75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास!

राज्यात नवीन सरकार (New Government) आले. या सरकारने 75 वर्षांच्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास (Free Traveling Scheme) योजना सुरु केली आहे. राज्य सरकारने यापूर्वीच या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य सरकारने शासकीय परिपत्रक (GR) काढले आहे. त्यामुळे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या राज्यातील नागरिकांना एसटीचा प्रवास पूर्णतः मोफत आहे. त्यांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे.

50 टक्के सवलत!

ज्या नागरिकांचे वय 65 ते 75 वर्षांदरम्यान आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाने प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. ही सवलत सर्व प्रकारच्या बसेससाठी लागू आहे. या सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिकांना कुठेही प्रवास करता येतो. राज्यात कुठे ही फिरण्यासाठी नागिरकांना या सवलतीचा फायदा घेता येतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कामानिमित्त तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे असेल तर त्यांना हा प्रवास एकतर विनामूल्य अथवा सवलतीत करता येतो.

ही कागदपत्रे ठेवा सोबत!

विनामूल्य अथवा सवलतीतील प्रवासासाठी प्रवाशांना वयाचा पुरावा सिद्ध करणारी कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, राज्य सरकारचे ओळखपत्र, वाहतूक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पासपोर्ट, पॅनकार्ड, तहसीलदाराने दिलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे.

मोफत प्रवास योजनेसाठी प्रक्रिया!

एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही. त्यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी अथवा एसटी महामंडळाच्या कार्यालयात विशेष अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित ओळखपत्र दाखविल्यानंतर तुम्हाला एसटीचा प्रवास करता येईल. तसेच राज्य सरकारने दिलेल्या संधीचा लाभ घेता येईल. विनामूल्य प्रवास किंवा सवलतीच्या प्रवासासाठी बसमध्ये प्रवास करताना ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे.

महामंडळाकडून 24 विविध सवलती!

  • राज्य परिवहन महामंडळाकडून 24 विविध सामाजिक घटकांसाठी प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येते.
  • स्वातंत्र्य सैनिकांसह त्यांच्या सहकाऱ्यांना मोफत प्रवास करता येतो.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व्यक्तीला व साथीदाराला वर्षभर मोफत प्रवास करता येतो.
  • अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत इयत्ता 5 ते 10 वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना साध्या बसचा प्रवास मोफत असतो.
  • शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकाराला साध्या बसमध्ये प्रवास सवलत देण्यात येते.
  • विद्यार्थ्यांना मासिक पास सवलत देण्यात येते.
  • नैमित्तिक करारावर ही सवलत देण्यात येते.