Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Samsung New Smartphones: Samsung च्या तीन मोबाईलची बाजारात होणार एन्ट्री

Samsung New Smartphones

Samsung Latest Smartphones: 2023 या नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच सॅमसंग खास ग्राहकांसाठी एक, दोन नाही तर तब्बल तीन स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. हे तीन मोबाईल कोणते आहेत, त्यांच्या किंमती काय आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Samsung New Smartphones: सध्या बाजारात एकापेक्षा एक मोबाईल लाँच होत आहे. त्यामुळे या मोबाईलच्या बाजारात विविध मोबाईल कंपनींची चुरस सुरू आहे. एकामागे एक कंपन्या नवनवीन मोबाईल लाँच करत असल्याचे दिसत आहे. आता हेच बघा ना, सॅमसंग आता एक, दोन नाही तर तब्बल तीन मोबाईल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. याविषयी अधिक जाणून घेऊ.

मोबाईलचे नाव (Mobile Name)

1 फेब्रुवारीला सॅमसंगचे हे तीन मोबाईल बाजारात जोरदार एन्ट्री करणार असल्याचे समजत आहे. पण ही तारीख अधिकृत नाही. सॅमसंग कंपनीकडून झालेल्या चुकीमुळे आगामी Galaxy Unpacked 2023 इव्हेंटची तारीख ग्राहकांसमोर आली आहे, ज्यामध्ये Samsung Galaxy S23 ही सीरिज लाँच होणार आहे. ज्यामध्ये Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 अल्ट्रा मॉडेल्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे की, सॅमसंग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट दरम्यान हे डिव्हाइसेस लाँच करणार आहे.

मोबाईलची किंमत (Price of Mobile)

सॅमसंगच्या S23 हँडसेटची किंमत व S22 सीरिजची किंमत एकच असण्याची शक्यता आहे. व्हॅनिला Galaxy S23 आणि Galaxy S23+ हे 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज मॉडेल्ससह लाँच करण्यात येणार आहेत, तर टॉप-ऑफ-द-लाइन Galaxy S23 Ultra 12GB रॅम आणि 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज पर्यायांसह लाँच करणार असल्याचे समजत आहे. लीक झालेल्या रेंडर्सनुसार, Galaxy S23 आणि Galaxy S23 अल्ट्रा मॉडेल्स बोटॅनिक ग्रीन, कॉटन फ्लॉवर आणि फँटम ब्लॅक शेड्समध्ये उपलब्ध असतील.

मोबाईल लाँचची तारीख कशी कळाली?(How to know the Mobile Launch Date)

कोलंबियाच्या वेबसाइटवर, नाईन टू फाईव्ह गुगल द्वारे पाहिल्याप्रमाणे, आगामी Galaxy Unpacked इव्हेंटची प्रमोशनल इमेज, इव्हेंटची तारीख आणि वेळ दिसली असल्याची माहिती मिळाली. टीझर पोस्टरनुसार, Galaxy Unpacked 2023  फेब्रुवारीमध्ये लाँच होईल. Galaxy Unpacked 2023 इव्हेंटबाबत सॅमसंगकडून अद्याप कोणतीही माहिती कळाली नाही.