Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासासाठी बजेटमध्ये तरतूद; आरोग्य आणि कृषी क्षेत्राला होणार फायदा

AI centres of excellence

केंद्रीय बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केले. या बजेटमधून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली. आरोग्य, कृषी आणि उद्योगांच्या वाढीसाठी artificial intelligence क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Budget 2023: केंद्रीय बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केले. या बजेटमधून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली. आरोग्य, कृषी आणि उद्योगांच्या वाढीसाठी artificial intelligence क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. "AI made for India" असे मिशन सुरू करण्याची घोषणा निर्मला सितारामन यांनी केली.

देशभर तीन अत्याधुनिक AI सेंटर्स (centres of excellence for artificial intelligence)

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी देशभर तीन एक्सलंस सेंटर्स (AI centres of excellence)  उभारण्याची घोषणा निर्मला सितारामन यांनी केली. देशातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांमध्ये हे सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज देशाला असल्याचे बजेटमध्ये अधोरेखित करण्यात आले. या तीन सेंटर्समधून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संशोधन, अभ्यास आणि विविध क्षेत्रांसाठी AI कसे काम करू शकते, यावरील प्रकल्पांवर काम चालणार आहे.

अॅप विकासासाठी 100 लॅब उभारणार  (100 labs for developing applications)

5G सेवेचा वापर करून अॅप उभारणीसाठी देशभरात 100 लॅब सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली. या सर्व लॅब अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्यात येणार आहेत. या लॅब उभारण्यासाठी विविध सरकारी संस्था, उद्योग आणि बँकांचीही मदत घेण्यात येणार आहे.

कोणत्या क्षेत्रांमध्ये AI च्या वापरासाठी प्रोत्साहन मिळणार? (AI will help Agri and Health sector)

आरोग्य, कृषी, स्मार्ट आणि शाश्वत शहरे विकसित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे. तसेच शेती प्रक्रिया, पद्धती आणि आधुनिक शेती करण्यासाठी AI चे कसे अॅपलिकेशन करता येईल यावर काम करण्यात येणार आहे. AI द्वारे रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावे यासाठी आरोग्य क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.