Rice Purchase: भारतात मोठ्या प्रमाणावर तांदळाची शेती(Rice Farming) केली जाते. भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आहारात तांदळाचा समावेश आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी सुरु असून काही राज्यातील खरेदी पूर्ण झाली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये(UP) अजूनही तांदळाची(Rice) खरेदी सुरु आहे. भारतातील सर्वात जास्त तांदूळ खरेदी करणारे छत्तीसगडमध्ये हे पहिले राज्य ठरले आहे. चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
'या' राज्याने केलायं सर्वाधिक तांदूळ खरेदी
छत्तीसगड(Chhattisgarh) राज्याने तांदळाची सर्वात जास्त खरेदी केली आहे. आत्तापर्यंत छत्तीसगडमध्ये 100 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी केला गेला आहे. हा वेग सर्वाधिक असून मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी तिथे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तांदूळ खरेदी केल्यानंतर राज्य सरकार 72 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवत आहे. यामुळे शेतकरी देखील आनंदी आहेत. छत्तीसगड सरकारने तांदूळ खरेदीसाठी 31 जानेवारी 2023 ही अंतिम तारीख ठरवली आहे. सध्या तांदूळ खरेदीसाठी केवळ 10 दिवस शिल्लक आहेत.आगामी काळात अधिक वेगाने ही खरेदी वाढणार असून त्यामुळे तांदूळ खरेदीचा नवा विक्रम होणार असल्याची माहिती तांदूळ खरेदी केंद्राकडून देण्यात आली आहे.
राज्यमंत्र्यांनी साजरा केला आनंद
छत्तीसगड राज्यात 100 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाल्यामुळे राज्य सरकारचे मंत्री आणि अधिकारीही खूश झाले आहेत. राज्यात 100 लाख मेट्रिक टन धान्य खरेदीचा आकडा पार केल्याबद्दल कृषीमंत्री अमरजित भगत(Agriculture Minister Amarjeet Bhagat) यांनी त्यांच्या कार्यालयात केक कापून हा आनंद साजरा केला आहे.