Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Most Expensive Train in the Country : ‘ही’ आहे देशातील सर्वात महागडी ट्रेन, जाणून घ्या वैशिष्ट्य

Most Expensive Train in the Country

Image Source : www.scroll.in

ट्रेनला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते, कारण देशात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनचा प्रवास साधारणपणे अतिशय आरामदायी आणि किफायतशीर असतो, त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते. पण देशात एक अशी ट्रेन आहे जी सुविधा देते पण सर्वात जास्त भाडे आकारते, म्हणूनच या ट्रेनला भारताची सर्वात महागडी ट्रेन म्हणतात. विशेष म्हणजे ही ट्रेन एखाद्या फिरत्या 5 स्टार हॉटेलसारखी आहे. ट्रेनमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना आपण उत्तम हॉटेलमध्ये पोहोचल्याचा भास होतो. या ट्रेनची सर्व वैशिष्ट्ये जसे की, भाडे, मार्ग आणि बुकिंग संबंधित माहिती मिळवूया. देशातील सर्वात महागडी ट्रेन म्हटली जाणारी महाराजा एक्सप्रेस ही इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC - Indian Railways Catering and Tourism Corporation) द्वारे चालवली जाते. 

महाराजा एक्सप्रेसचे मार्ग

महाराजा ट्रेनमध्ये मिळणार्‍या सुविधाही अगदी राजेशाही आहेत आणि आतून तो एखाद्या आलिशान महालासारखा दिसतो. ही ट्रेन 7 दिवस चार वेगवेगळ्या मार्गांवर धावते. त्यात 'द इंडियन पॅनोरमा', 'ट्रेझर्स ऑफ इंडिया', 'द इंडियन स्प्लेंडर' आणि 'द हेरिटेज ऑफ इंडिया' या मार्गांचा समावेश आहे.

या मार्गांवर धावते

  • इंडियन पॅनोरमा : दिल्ली-जयपूर-रणथंबोर-फतेहपूर सिक्री-आग्रा-ओर्छा-खजुराहो-वाराणसी मार्गे दिल्लीला पोहोचते. 7 दिवस आणि 6 रात्रीचा हा प्रवास खूप आनंददायी असतो आणि या मार्गाचे भाडे तुम्ही ट्रेनमध्ये कोणती केबिन किंवा सूट बुक करता यावर अवलंबून आहे.
  • द इंडियन स्प्लेंडर : दिल्ली आणि आग्रा-आग्रा-रणथंबोर-जयपूर-बिकानेर-जोधपूर-उदयपूर-मुंबई दरम्यान धावते. या मार्गावरील प्रवासालाही 7 दिवस आणि 6 रात्री लागतात.
  • ट्रेझर्स ऑफ इंडिया : दिल्ली-आग्रा-रणथंबोर-जयपूर आणि दिल्ली दरम्यानचा प्रवास. या मार्गावरील प्रवासाला 4 दिवस आणि 3 रात्री एवढा वेळ लागतो.
  • द हेरिटेज ऑफ इंडिया : मुंबई-उदयपूर-जोधपूर-बिकानेर-जयपूर-रणथंबोर आणि फतेहपूर सिक्री-आग्रा दरम्यान धावते. हा मार्ग 7 दिवस आणि 6 रात्रीचा आहे.

या सुविधा मिळतात

कोणत्याही आलिशान हॉटेलपेक्षा जास्त सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. या ट्रेनमधील आतील रचना देखील अतिशय सुंदर आहे. ट्रेनमध्ये राजेशाही व्यवस्था पाहायला मिळते. ट्रेनमध्ये तुम्हाला ड्युलक्स केबिन आणि सूटची सुविधाही मिळते. रेस्टॉरंट, लाउंज बार आणि इतर सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.

महाराजा एक्स्प्रेसचे भाडे

महाराजा एक्सप्रेस ट्रेन ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत 4 वेगवेगळ्या मार्गांवर धावते आणि तिचे भाडे सुमारे 5 लाख ते 20 लाखांपर्यंत असते. कारण या गाड्यांमध्ये ड्युलक्स केबिन तसेच सुट आहेत आणि सर्वांचे शुल्क वेगवेगळे आहे.

अशी करा बुकींग

महाराजा एक्सप्रेसमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जाण्याची गरज नाही. महाराजा एक्सप्रेसच्या वेबसाइटवर तुम्ही घर बसल्या तिकीट बुक करू शकता. ट्रेनचे 4 मार्ग आणि उपलब्ध सुविधांची माहिती येथे तपशीलवार देण्यात आली आहे.