• 05 Feb, 2023 13:18

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC Retiring Room:फक्त 20 रुपयांत पंचतारांकित हॉटेलचा लाभ!

www.financialexpress.com

IRCTC: रेल्वेने दिलेल्या 'रिटायरिंग रूम' (RR) च्या सुविधेबद्दल अनेकांना माहिती नाही. RR साठी 20 ते 40 रुपये देऊन तुम्ही निवांतपणे पंचतारांकित प्रतिक्षागृहात ट्रेनची वाट पाहू शकता.

IRCTC Retiring Room: वाढत्या थंडी आणि धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या तासंतास उशिराने धावत आहेत. अशा परिस्थितीत या गाड्यांचे तिकीट काढलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर किंवा 'रेल्वे रिटायरिंग रूम'मध्ये ट्रेनची वाट पाहत वेळ घालवण्याचा पर्याय आहे. रेल्वेने पुरविलेल्या 'रिटायरिंग रूम' (RR) च्या सुविधेबद्दल सर्वांनाच माहिती नाही. RR साठी 20 ते 40 रुपये देऊन तुम्ही सोयीस्करपणे पंचतारांकित सुविधेचा लाभ घेत ट्रेनची वाट पाहू शकता.  

5 स्टार हॉटेल रूम सारखी सुविधा  

रेल्वे रिटायरिंग रूममध्ये (Railway Retiring Room) तुम्हाला 5 स्टार हॉटेल रूममध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. तुमच्याकडे कन्फर्म (Confirmed) किंवा आरएसी (RAC) तिकीट असल्यास, तुम्ही 'रिटायरिंग रूम' बुक करू शकता. यासाठी तुम्हाला 48 तासांसाठी फक्त 40 रुपये शुल्क भरावे लागेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांवर रिटायरिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.  

प्रमुख स्थानकांवर रिटायरिंग रूमची व्यवस्था  

रिटायरिंग रूम बुक करण्यासाठी तुमच्याकडे कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असणे आवश्यक आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर रिटायरिंग रूम उपलब्ध आहेत. तुम्ही तिकिटाच्या पीएनआर क्रमांकाद्वारे (PNR Number) रिटायरिंग रूम बुक करू शकता. रिटायरिंग रूम एसी (AC)आणि नॉन एसी (Non AC)अशा दोन्ही प्रकारच्या असतात. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवाशांना ही सुविधा दिली जाते.  

रिटायरिंग रूम कसे बुक करायचे?  

रिटायरिंग रूम बुक करण्यासाठी, तुमचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी असणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रेल्वेच्या https://www.rr.irctctourism.com/#/home या वेबसाइटवर जावे लागेल . येथे तुम्ही रिटायरिंग फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर, पीएनआर नंबरच्या मदतीने तुमचे बुकिंग करा. एका पीएनआर नंबरवर (PNR Number) फक्त एक खोली बुक केली जाऊ शकते.  

IRCTC, PNR नंबरच्या आधारे बुक केलेल्या रिटायरिंग रूमसाठी 24 तासांसाठी 20 रुपये भाडे आकारते. शयनगृहासाठी वेगळे 10 रुपये आकारले जातील. जर तुम्हाला 48 तासांसाठी राहायचे असेल तर 40 रुपये मोजावे लागतील. या खोल्या जास्तीत जास्त 1 तास ते 48 तासांच्या कालावधीसाठी बुक केल्या जाऊ शकतात.