तुम्हाला लक्झरी हँडबॅग्जची (Luxury handbag) थोडीशीही आवड असेल तर तुम्ही चॅनेल क्लासिक फ्लॅप बॅग किंवा हर्मीस बर्किनबद्दल नक्कीच ऐकलं असेल. परंतु तुम्ही कदाचित एमएससीएचएफच्या (MSCHF) मायक्रोस्कोपिक हँडबॅगबद्दल ऐकलं आहे का? 0.03 इंचापेक्षादेखील कमी रुंद, न्यू यॉर्क बेस्ट आर्ट कलेक्टिव्ह एमएससीएचएफची मायक्रोस्कोपिक हँडबॅग इतकी लहान आहे, की ती बोटाच्या टोकावर असताना माणूस पाहूदेखील शकत नाही. तरीही या आठवड्यात लिलावात ती 60,000 डॉलरपेक्षा जास्त किंमतीला विकली गेली आहे.
Table of contents [Show]
थ्रीडी प्रिंटरचा वापर
निऑन ग्रीन आणि 2 फोटॉन पॉलिमरायझेशन प्रिंटिंग पद्धती वापरून थ्रीडी (3D) प्रिंटरद्वारे तयार केलेली ही बॅग जी लुई व्हिटॉनच्या (Louis Vuitton) प्रसिद्ध ऑनदगो (OnTheGo) टोटच्या आधारावर तयार केलेली आहे. या बॅगला मायक्रोस्कोपद्वारे पाहता येवू शकतं. या सूक्ष्मदर्शकातून जवळून पाहिल्यावर बॅगवरचा “LV” मोनोग्राम स्पष्टपणे दिसू शकतो.
जुपिटरकडून ऑनलाइन लिलाव
एमएससीएचएफचं स्मॉल वेअर जे टेक्निकली 657 बाय 222 बाय 700 मायक्रॉनचं आहे. फॅरेल विल्यम्स यांच्या ऑनलाइन ऑक्शन हाऊस जुपिटरनं हे प्रॉडक्ट लिलावासाठी ठेवलं होतं. दरम्यान, जुपिटरनं दिलेल्या माहितीनुसार, हे प्रॉडक्ट 63,750 डॉलरमध्ये विकलं गेलं. उल्लेखनीय म्हणजे निर्माता, रॅपर आणि गायक सध्या लुई व्हिटॉनच्या मेन्सवेअरचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत.
वस्तू नाही दागिना
एमएससीएचएफचे मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर केविन विस्नर यांनी यासंदर्भात सांगितलं, की ही बॅग एक मजेदार गोष्ट आहे. ही एक वस्तू नसून दागिनाच आहे. याविषयीची पोस्ट करताना या बॅगचा उल्लेख मीठाच्या दाण्यापेक्षाही लहान असा करण्यात आला.
कंपनीचे मालक बर्नार्ड अर्नाल्ट
हे प्रॉडक्ट लुई व्हिटॉन या मूळ फ्रान्सच्या कंपनीनं तयार केलं आहे. विविध महागडे प्रॉडक्ट तयार करणं हे या कंपनीचं वैशिष्ट्य आहे. लुई व्हिटॉन हा एक जुना लक्झरी ब्रांड आहे. श्रीमंतांमध्ये या प्रॉडक्ट्सची क्रेझ पाहायला मिळते. अभिनेत्राी समंता, दीपिका पदुकोण यांच्यासह विविध कलाकार या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरतात. बर्नार्ड अर्नाल्ट हे या कंपनीचे मालक असून श्रीमंतांच्या यादीत ते दुसऱ्या स्थानी आहेत.