Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

यामुळे स्मार्ट फोन आणि टीव्हींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

यामुळे स्मार्ट फोन आणि टीव्हींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

स्मार्ट फोनच्या किमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढू शकतात; कंपन्या ग्राहकांकडून वसूल करणार किंमत

चीनमधील शेनझेन या भागात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे इथे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शेनझेन हा जगभरातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. परिणामी, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोन आणि लॅपटॉपच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

भारतातील सुमारे 20 ते 50 टक्के इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचा पुरवठा चीनमधून होतो आणि यात शेनझेनचा सर्वांत मोठा वाटा असतो. शेनझेनमधील लॉकडाऊनची स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिली तर त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या उत्पादनावर होऊ शकतो. परिणामी इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या किमतीत वाढ होऊन त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसू शकतो, असे इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनचे (IDC) संशोधन संचालक नवकेंदर सिंग यांचे म्हणणे आहे.

शेनझेनमधील लॉकडाउन 3 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ राहिल्यास पुढील 3 महिन्यातील स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरच्या शिपमेंटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्मार्ट फोनच्या किमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढू शकतात, असे काऊंटरपॉईंट रिसर्चचे संशोधनक संचालक तरूण पाठक यांचे म्हणणे आहे.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या किमती आणि ट्रान्सपोर्टेशनचे दर नुकतेच वाढलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच कंपन्या आता ही दरवाढ सहन करू शकणार नाहीत. काही ठराविक कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्या किमान नफ्यावर काम करत आहेत. परिणामी याची किंमत ग्राहकांकडून वसूल केली जाऊ शकते, असे काही अभ्यासकांचे मत आहे.