Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LinkedIn Top 25 Companies: देशातील बेस्ट वर्कप्लेस कंपन्यांच्या यादीत टाटांची 'ही' कंपनी पहिल्या क्रमांकावर

Best Workplace Company

Image Source : www.datacenterdynamics.com

Best Workplace Company: सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म लिंक्डइनने देशातील बेस्ट वर्कप्लेस ठरलेल्या 25 कंपन्यांची यादी जाहीर केली. यामध्ये देशात पहिल्या क्रमांकावर टाटा ग्रुपमधील एका कंपनीचा समावेश आहे. ती कंपनी नेमकी कोणती आणि लिंक्डइनच्या अहवालात नेमके काय म्हटले आहे, हे जाणून घेऊयात.

प्रोफेशनल सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म लिंक्डइनने देशातील बेस्ट वर्कप्लेस (Best Workplace Company) कंपन्यांसंदर्भात एक रिपोर्ट तयार केला होता. यामधील टॉप 25 (LinkedIn Top 25 Companies List) कंपन्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. या 25 कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर टाटा ग्रुपच्या टीसीएसने (TCS) बाजी मारली आहे. त्यानंतर Amazon आणि Morgan Stanley या कंपन्यांचा नंबर लागला आहे.

LinkedIn ने वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे बेस्ट वर्कप्लेस कंपन्यांचे अवलोकन केले आहे. ज्यामध्ये कंपनीची आणि कर्मचाऱ्यांची प्रगती, कौशल्यातील वाढ, कंपनीची स्थिरता, आत्मीयता, लैगिक विविधता, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती या मुद्द्यांच्या विचार करण्यात आला आहे. लिंक्डइनच्या या अहवालाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

आयटीऐवजी 'या' क्षेत्रातील कंपन्यांनी मारली बाजी

LinkedIn ने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) पहिला क्रमांक पटकावला आहे. ही कंपनी काम करण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्यानंतर Amazon आणि Morgan Stanley या कंपन्यांचा नंबर लागला आहे.

गेल्या वर्षी या यादीत आयटी कंपन्यांचा दबदबा पाहायला मिळत होता. मात्र यंदाच्या यादीत आयटी कंपन्यांऐवजी वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था, बँका, ऑईल ॲण्ड गॅस कंपन्या, व्यावसायिक सेवा देणाऱ्या संस्था आणि गेमिंग कंपन्यांनी बाजी मारली आहे. अहवालातील माहितीनुसार 25 कंपन्यांपैकी 10 कंपन्या या वित्तीय संस्था, बँका आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत.

इतर कंपन्यांचे यादीतील स्थान जाणून घ्या

मॅक्वेरी ग्रुप (Macquarie Group) हे या यादीत पाचव्या स्थानावरआहे. तर HDFC बँक 11 व्या स्थानावर आहे. नामांकित कंपनी मास्टरकार्ड (Mastercard) ही 12 व्या आणि यूबी (UB) कंपनी 14 व्या स्थानावर आहे. महत्त्वाचे म्हणजे ई-स्पोर्ट्स आणि गेमिंगमधील Dream11 आणि Games 24x7 या कंपन्यांनी प्रथमच या यादीत स्थान मिळवले आहे. झेप्टो (Zepto) ही स्टार्टअप कंपनी टॉप स्टार्टअप यादीत देखील समाविष्ट होती. हीच कंपनी बेस्ट वर्कप्लेसच्या यादीत 16 व्या स्थानावर आहे.

बंगळुरु पहिल्या क्रमांकाचे शहर

लिंक्डइनने जाहीर केलेल्या यादीतील बऱ्याच कंपन्या या बंगळुरुमध्ये आहेत. त्यानंतर मुंबई, हैद्राबाद, दिल्ली आणि पुणे या शहरातील कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Source: livemint.com