Woollen Cloth Business: सध्या बाजारात गरम व ऊबदार कपडयांसाठी (Woollen Cloth Business) झुंबड उडालेली असते. त्यामुळे हा गरम कपड्यांचा (वुलन कपडयांचा) व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल. थंडीच्या या 2 ते 3 महिन्यात आपण प्रचंड पैसा कमावू शकता. मग जाणून घेऊयात या नवीन व्यवसायाबाबत थोडक्यात.
Table of contents [Show]
गरम कपडयांचा व्यवसाय
जसे की, स्वेटर, शाल, टोपी, जॅकेट, मफलर आदि कपडयांचा थंडीत मोठया प्रमाणात वापर केला जातो. यात स्टायलिश विंटर वियर्स कपडयांचीदेखील भर पडली आहे. त्यामुळे हा व्यवसाय आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल. त्यामुळे या थंडीच्या कपडयांमध्ये आपल्याकडे जितकी जास्त व्हरायटी असेल, तितक्या प्रमाणात ग्राहक आपल्या दुकानाकडे आकर्षित होईल. एवढेच नाही, तर हा व्यवसाय आपण ऑनलाइन व ऑफलाइन ही करू शकता.
होलसेल माल कुठे मिळेल?
आपण पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यातून वुलन्स कपडे अगदी होलसेल दरात खरेदी करू शकता. कारण हे सर्व राज्य थंडीतील वुलन कपडयांमध्ये खरेदी-विक्रीत अव्वल आहे. आपल्या शहरात ही या व्यवसायाचे व्यापारी भेटतील.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींवर ठेवा लक्ष
आपण ज्या ठिकाणी गोदाम उघडणार आहात, ती जागा एकदम कोरडी असली पाहिजे. कारण ओली जागा ही आपल्या वुलन्स कपडयांना खराब करू शकते. त्यामुळे आपल्या मालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ओल्या जागेत कपडे ठेवल्याने बुरशी ही लागू शकते. त्यामुळे थंडीतील कपडे हे स्वच्छ व कोरडया जागी ठेवावे.
किती पैसे कमवू शकता?
आपल्या मेहनतीवर हा व्यवसाय किती नफा कमवून देईल हे ठरते. या व्यवसायाचा एक प्लस पॉईंट असा आहे की, हा व्यवसाय इतर सीझनपेक्षा अधिक पैसा मिळवून देतो. दुकान नाही, तर आपण घरबसल्या ऑनलाइन व ऑफलाइन ही कमवू शकता. म्हणजेच साधारणपणे हा व्यवसाय आपल्याला 30 ते 40 टक्के नफा मिळवून देईल ही खात्री आहे.