Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल लोन घेताय? मग हे वाचा!

पर्सनल लोन घेताय? मग हे वाचा!

वैयक्तिक कर्ज पात्रता- कर्ज घेण्यापूर्वी उत्पन्न आणि फेडण्याची क्षमता समजून घ्या

बँक किंवा फिनटेक कंपन्यांकडून वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी उत्पन्न आणि फेडण्याच्या क्षमतेचे आकलन करणे गरजेचे आहे. यातून आपण सहजपणे कर्ज फेडण्याचे नियोजन करू शकतो, जेणे करुन कर्जाच्या दलदलीत आपण अडकणार नाही.

हप्ता 50 टक्क्यांपेक्षा कमी असावा

कर्ज कोणतेही असो, त्याचा हप्ता हा आपल्या उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमीच असावा. जर अधिक हप्ता झाला तर ती धोक्याची घंटा समजावी. साधारणपणे कर्जाचा हप्ता हा 20 ते 30 टक्क्यांपर्यंत असणे हे आदर्श प्रमाण मानले जाते.

बचतीची सवय लावा

प्रत्येक व्यक्तीने दरमहा उत्पन्नातून किमान दहा ते वीस टक्के बचत करायला हवी. जर आपले संपूर्ण उत्पन्न खर्च होत असेल तर तो खर्च आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, असे समजावे. अशा स्थितीत आपण बिकट स्थितीचा सामना करू शकणार नाही आणि कर्जात अडकत जाल. यापासून वाचण्यासाठी आपण खर्चाला नियंत्रित करणे गरजेचे आहे.

कमी खर्चासाठी कर्ज नको

साधारणपणे अनेक मंडळी नियमित खर्चासाठी देखील कर्ज घेतात. याप्रकारच्या खर्चात भाडे, मुलांची फिस आदी गोष्टींचा देखील समावेश असतो. जर आपण याप्रमाणे नियमित खर्चासाठी कर्ज घेण्यास सुरवात केली तर आपल्यावरचे कर्जाचे जाळे अधिक गडद होत जाईल. त्यामुळे आपण खर्चाचे नियोजन करावे आणि त्यानुसार मासिक बजेट तयार करावे.

शुल्क वसुली

आज बाजारात पर्सनल लोन मिळण्यासाठी बँका, वित्तीय संस्था, पतसंस्था, सहकारी बँका आदी  अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या प्रत्येकाकडून आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. कमी व्याजदर, दिर्घ कालावधी आणि कर्जाचा आकडा पाहून काही जण हुरळून जातात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही मंडळी लगेच तयार होतात. मात्र कालांतराने काही बँकांनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने शुल्क वसूूली केल्याचे निदर्शनास येते. अर्थात त्याचा उल्लेख अटी आणि नियमात केलेला असतो, मात्र आपण त्याचे वाचन काळजीपूर्वक करत नाहीत.

नियम आणि अटी वाचा

बँकांकडून मंजुरीपूर्व पर्सनल लोनची ऑफर मिळाल्यानंतर त्याचे नियम आणि अटी वाचा. एवढेच नाही तर एखाद्या मार्केटिंग असिस्टंटकडून कर्जाविषयी माहिती घ्या. व्याजदराची स्थिती, प्रिपेमेंटच्या अटी, फ्लोटिंग की फिक्स रेट आदीसंदर्भात माहिती घ्या. बँकेच्या ग्राहक सेवा अधिकार्‍याची भेट घेऊन अटींची पडताळणी करा.

झिरो प्रोसेसिंग फिसची मागणी करा

जर आपल्याला बँकेकडून मंजूरी-पूर्व पर्सनल लोन मिळत असेल तर बँकेकडून झीरो प्रोसेसिंग फीसची मागणी करा. बँक आपले रेकॉर्ड पाहून कर्ज मंजुरीची विनाशुल्क प्रक्रिया पार पाडू शकते.

व्याजदराची तुलना

पर्सनल लोनवरचे व्याज हे नेहमीच गृहकर्ज आणि अन्य मॉर्गेज कर्जाच्या तुलनेत महागडे असते. यासाठी कर्ज घेण्यापूर्वी दुसर्‍या बँकांच्या व्याजदराची तुलना करा. जर मंजुरीपूर्व वैयक्तिक कर्जाचे व्याजदर अधिक असेल तर कर्ज घेणे टाळावे.

क्रेडिट स्कोअर तपासा

कर्ज देण्यापूर्वी बँक क्रेडिट स्कोर तपासते. चांगला क्रेडिट स्कोर असल्यास बँक मंजुरीपूर्व कर्ज ऑफर करते. जर आपला क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर कमी व्याजावर कर्ज मिळू शकते.