असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) वेबसाइटवर सध्या कोणत्या फंडमधून किती परतावा मिळाला, याची माहिती देण्यात आलीय. या उपलब्ध असलेल्या डेटावरून काही बाबी स्पष्ट होतायत. असे 8 मिड कॅप फंड यात आहेत, ज्यांनी एका वर्षात 19 टक्क्यांपर्यंत परतावा दिलाय. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड डायरेक्ट प्लॅननं यावेळी 28.91 टक्क्यांचा आश्चर्यकारक असा परतावा दिलाय. चांगला परतावा देणाऱ्या फंडच्या तुम्हीही शोधात असाल आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment) करण्याचं ठरवलं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी कोणत्या फंडांनी कशी कामगिरी केली हे पाहावं लागणार आहे. एका वर्षातले टॉप परफॉर्मिंग मिड कॅप फंडांत कोणाचा समावेश आहे, त्याचबरोबर भविष्यातही हे फंड चांगला परतावा देतील, याची हमी वाटत असेल तर गुंतवणूक करणं योग्य राहील.
Table of contents [Show]
मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड
मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅननं 28.91 टक्के परतावा दिला आहे. तर नियमित योजनेनं 1 वर्षात 27.43 टक्के परतावा दिल आहे. ही योजना निफ्टी मिड कॅप 150 एकूण परतावा निर्देशांकाला ट्रॅक करते. यानं 1 वर्षात 19.53 टक्के परतावा दिला आहे.
एचडीएफसी मिड कॅप अपॉर्च्युनिटीज निधी
एचडीएफसी मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाच्या डायरेक्ट प्लॅननं 26.99 टक्के परतावा दिला आहे. नियमित योजनेनं 1 वर्षात 26.19 टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिड कॅप 150 एकूण परतावा निर्देशांकाला ट्रॅक करते. ज्याने 1 वर्षात 19.53 टके परतावा दिला आहे.
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडच्या डायरेक्ट प्लॅननं 20.44 टक्के परतावा दिला आहे. फंडाच्या नियमित योजनेनं 1 वर्षात 19.46 टक्के इतका परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिड कॅप 150 एकूण परतावा निर्देशांकाला ट्रॅक करते, ज्याने 1 वर्षात 19.53 टक्के परतावा दिला आहे.
फ्रँकलिन इंडिया प्राइम फंड
फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंडाच्या डायरेक्ट प्लॅननं 20.76 टक्के परतावा दिला आहे. तर नियमित योजनेनं 1 वर्षात 19.76 टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिड कॅप 150 एकूण परतावा निर्देशांकाला ट्रॅक करते, ज्यानं 1 वर्षात 19.53 टक्के परतावा दिला आहे.
एडलवाईस मिड कॅप फंड
एडलवाईस मिड कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅननं 20.56 टक्के परतावा दिला आहे. याच्या नियमित योजनेनं 1 वर्षात 18.71 टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिड कॅप 150 एकूण परतावा निर्देशांकाला ट्रॅक करते, ज्यानं 1 वर्षात 19.53 टक्के इतका परतावा दिला आहे.
एसबीआय मॅग्नम मिड कॅप फंड
एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅननं 19.75 टक्के परतावा दिला आहे. याच्या नियमित योजनेनं 1 वर्षात 18.71 टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिड कॅप 150 एकूण परतावा निर्देशांकाला ट्रॅक करते. ज्यानं 1 वर्षात 19.53 टक्के परतावा दिला आहे.
सुंदरम मिड कॅप डायरेक्ट फंड
सुंदरम मिड कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅननं 19.56 टक्के परतावा दिला आहे. नियमित योजनेनं 1 वर्षात 18.50 टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिड कॅप 150 एकूण परतावा निर्देशांकाला ट्रॅक करते, ज्याने 1 वर्षात 19.53 टक्के परतावा दिला आहे.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)