मिड कॅप फंड (Mid cap funds) हे गुंतवणूकदारांचं कायमच आकर्षण राहिलंय. या निधीतला पैसा मार्केट कॅपच्या दृष्टीनं शेअर बाजारातल्या टॉप 101-250 कंपन्यांमध्ये गुंतवला जात असतो. एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात (मार्च 2023) मिडकॅप फंडामध्ये एकूण 2129 कोटी रुपये गुंतवले गेलेत. तर 2023च्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण 5573 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या मिड कॅप फंडामध्ये विविध योजना सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्यातही सर्वात पसंत केल्या गेलेल्या ज्याद्वारे परतावा चांगला मिळतो, अशा तीन योजनांची आयसीआयसीआय डायरेक्टरनं निवड केलीय. आयसीआयसीआय डायरेक्ट ही एक ब्रोकरेज फर्म आहे. निवडलेल्या टॉप 3 फंडांनी मागच्या तीन वर्षांत निव्वळ आधारावर तब्बल 150 टक्क्यांपर्यंत परतावा दिलाय.
Table of contents [Show]
टॉप 3 मिड कॅप फंड
- एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटी निधी (HDFC MidCap Opportunities Fund)
- निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड (Nippon India Growth Fund)
- कोटक इमर्जिंग इक्विटी फंड (Kotak Emerging Equity Fund)
एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटी निधी
एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेला मिड कॅप फंड आहे. मागच्या तीन वर्षांत एकरकमी गुंतवणूकदारांना या फंडानं निव्वळ आधारावर 151 टक्के इतका घसघशीत परतावा दिलाय. उदाहरणादाखल - समजा एखाद्या गुंतवणूकदारानं 3 वर्षांपूर्वी या फंडात 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचं आजचं मूल्य सुमारे 2.51 लाख रुपये इतकं झालं असतं. एकरकमी गुंतवणूकदारांसाठी सरासरी वार्षिक परतावा 36 टक्क्यांच्या जवळपास आहे.
तीन वर्षांचं गणित आणि कमाल-किमान रक्कम
समजा एखाद्या गुंतवणूकदारानं तीन वर्षांपूर्वी 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचं मूल्य 5 लाख रुपयांच्या जवळपास गेलं असतं. गुंतवणूकीची एकूण रक्कम 3.6 लाख रुपये इतकी होते. याचं गणित केल्यात गुंतवणूकदारांना या एसआयपीमार्फत जवळपास 22.58 टक्के इतका वार्षिक परतावा दिलाय. किमान एसआयपी 100 रुपये तर किमान गुंतवणुकीची रक्कम 100 रुपये इतकी आहे.
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड
गुंतवणूकदारांसाठीचा मिड कॅप फंडाचा दुसरा आणि उत्तम पर्याय म्हणजे निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड होय. या फंडानं एकरकमी गुंतवणूकदारांना तीन वर्षांत निव्वळ आधारावर 148.75 टक्के इतका परतावा दिलाय. तर वार्षिक सरासरी परतावा 35.49 टक्के इतका आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदारानं तीन वर्षांपूर्वी या फंडात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचं मूल्य आज 2.48 लाख रुपये इतकं झालं असतं.
10 हजारांच्या एसआयपीमधून 4.83 लाख
समजा एखाद्या गुंतवणूकदारानं तीन वर्षांपूर्वी 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर त्याचं आजचं मूल्य 4.83 लाख रुपये झालं असतं. गुंतवणूकीची एकूण रक्कम 3.6 लाख रुपये असणार आहे. वार्षिक सरासरी परतावा 20.11 टक्के इतका आहे. 100 रुपयांची किमान गुंतवणूक आणि किमान 100 रुपयांची एसआयपी करता येवू शकते.
कोटक इमर्जिंग इक्विटी फंड
मिड कॅप फंडातला कोटक इमर्जिंग फंड हादेखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार फंड आहे. जोखीम जास्त असली तरी या फंडाच्या माध्यमातून जवळपास 36.06 इतका घसघशीत परतावा मिळत असल्याचं कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर नमूद आहे.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)