Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Large Cap Fund: 'या' म्युच्युअल फंड योजनांनी गेल्या 10 वर्षांत 14 ते 16 टक्के परतावा दिला

Best Large Cap Fund

Best Large Cap Fund: गेल्या 10 वर्षात लार्ज कॅप प्रकारातील म्युच्युअल फंडांनी डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Best Large Cap Fund: म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारांमधून गुंतवणूक करता येते. यात प्रामुख्याने लार्ज कॅप, मिडिअम कॅप आणि स्मॉल कॅप या कंपन्यांच्या भांडवलाच्या आकारमानानुसार प्रकार पडतात. त्यातील लार्ज कॅप हा प्रकार तुलनेने सर्वांत कमी जोखीम असलेला प्रकार मानला जातो. या प्रकारातील तब्बल 11 म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या 10 वर्षांत 14 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय) या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, लार्ज कॅप म्युच्युअल फंड स्कीमने गुंतवणूकदारांना डायरेक्ट गुंतवणुकीतून चांगला परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला मागील 10 वर्षापासून 19 मे, 2023 पर्यंत ज्या लार्ज कॅप प्रकारातील कपन्यांनी चांगला परतावा दिला आहे. त्या कंपन्यांनी आतापर्यंत डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅनमधून गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे. याची माहिती देणार आहोत.

त्यापूर्वी आपण डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅन (Direct & Regular Investment Plan) हे दोन प्रकार काय आहेत. ते समजून घेऊ. रेग्युलर प्लॅन हा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरद्वारे राबवला जातो. यामध्ये बॅंका, वेल्थ मॅनेजर्स, वैयक्तिक आणि कॉर्पोरेट डिस्ट्रिब्युटर्स सहभागी असतात. यांना म्युच्युअल फंडच्या योजनांची विक्री केल्यानंतर त्यावर कमिशन मिळते. तर डायरेक्ट प्लॅन हा थेट कंपनीद्वारे राबवला जातो. यामध्ये गुंतवणूकदाराला कोणालाही कमिशन द्यावे लागत नाही. इथे फक्त गंतवणूदार आणि थेट कंपनी अशी गुंतवणूक होत असते. 

Benefits of SIP

एखाद्या गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची मासिक गुंतवणूक (Systematic Investment Plan-SIP) केली असती तर, 10 वर्षात ती गुंतवणूक 26 लाखापर्यंत गेली असती. असे आकडे म्युच्युअल फंडच्या परताव्यावरून दिसत आहेत. तर आज आपण अशाच लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांनी माहिती घेणार आहोत. ज्यांनी मागील 10 वर्षात गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांपेक्षा  अधिक परतावा दिला आहे.

मिराई अ‍ॅसेट लार्ज कॅप फंड 

मिराई अ‍ॅसट लार्ज कॅप फंडमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने डायरेक्ट प्लॅनद्वारे गुंतवणूक केली असती तर त्याला 16.63 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला असता. आणि त्याने रेग्युलर प्लॅनद्वारे गुंतवणूक केली असती तर गेल्या 10 वर्षात 15.53 टक्के परतावा मिळाला असता.

निप्पॉन इंडिया  लार्ज कॅप फंड

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडमध्ये डायरेक्ट प्लॅनद्वारे गुंतवणूक केली असती गुंतवणूकदाराला 15.76 टक्के परतावा मिळाला असता आणि तिच गुंतवणूक त्याने रेग्युलर प्लॅनमधून केली असती तर त्याला 10 वर्षात 14.75 टक्के परतावा मिळाला असता.

बडोदा बीएनपी परिबास लार्ज कॅप फंड

बडोदा बीएनपी परिबास लार्ज कॅप फंडमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षात 14.97 टक्के परतावा मिळाला आहे. तर रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 13.67 टक्के परतावा मिळाला आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल ब्ल्यूचिप फंड

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल ब्ल्यूचिप फंडने गुंतवणूकदारांना डायरेक्ट प्लॅनमधून गेल्या 10 वर्षात 14.85 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून गुंतवणूकदारांना यातून 13.95 टक्के परतावा मिळाला आहे.

एसबीआय ब्ल्यूचिप फंड

एसबीआय ब्ल्यूचिप फंडच्या डायरेक्ट प्लॅनने गुंतवणूकदारांना 15.23 टक्के तर रेग्लुयलर प्लॅनमधून 14.26 टक्के परतावा दिला आहे.

कॅनरा रिबेको ब्ल्यूचिप इक्विटी फंड

कॅनरा रिबेके ब्ल्यूचिप इक्विटी फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने गुंतवणूकदारांना 14.56 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षात 13.21 टक्के परतावा मिळाला आहे.

कोटक ब्ल्यूचिप फंड

कोटक ब्ल्यूचिप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकादारांना मागील 10 वर्षात 14.15 टक्के परतावा प्राप्त झाला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून 12.88 टक्के परतावा मिळाला आहे.

एड्लवाईज लार्ज कॅप फंड

एड्लवाईज लार्ज कॅप फंडमध्ये डायरेक्ट गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या स्कीमने 14.16 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून यात गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या 10 वर्षात 12.98 टक्के परतावा मिळाला आहे.

(डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)