Increase in price of soap, toothpaste, shampoo: साबण, टूथपेस्ट, शॅम्पूच्या या दैनंदिन जीवनातील महत्वपूर्ण गोष्टी आहेत. मात्र या वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनी (Hindustan Unilever Limited Company) वर्तवली आहे. ही कंपनी ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणारी मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीने आता वाढत्या महागाईमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमतीत वाढ करणार असल्याचे सांगितले आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ही कंपनी अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी आहे. तसेच रिन (Rin), लक्स (Lux), लाइफबॉय (Lifebuoy), फेअर अॅण्ड लव्हली (Fair and lovely), हॉर्लिक्स या दैनंदिन वस्तूंचीदेखील ही कंपनी निर्मिती करते. हिंदुस्तान युनिलिव्हकची मूळ कंपनी असलेल्या युनिलिव्हर पीएलसीने आपल्या रॉयल्टी शुल्कात 80 बेस पॉईंट्सने वाढ केली असून ही वाढ तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. युनिलिव्हरने रॉयल्टी शुल्कात प्रथमच दहा वर्षांत वाढ केली आहे. यापूर्वी कंपनीने 2013 साली ही वाढ केली होती.
नवीन करारानुसार रॉयल्टी आणि केंद्रीय सेवा शुल्क हा 3.45 टक्के करण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्षात 2.65 टक्के होता. मागील आर्थिक वर्षात HULचा महसूल 51,193 कोटी रुपये असा होता. जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 11.3 टक्क्यांनी वाढला आहे. यापैकी कंपनीने 2.65 टक्के रॉयल्टी फी मूळ कंपनीला दिली आहे. रॉयल्टी शुल्कातील 80 bps वाढ ही तीन टप्प्यांत लागू करण्यात येणार आहे. यामुळे फेब्रुवारी ते डिसेंबर 2023 साठी HUL चे रॉयल्टी शुल्क 45 bps ने वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 2024 मध्ये 25 bps आणि 2025 मध्ये 10 टक्क्यांती वाढ होण्याचा शक्यता कंपनीने वर्तविली आहे. तसेच कंपनीचे शेअर्सदेखील घसरल्यामुळे या वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे.