Shark Tank India 2: सर्वात आवडत्या शो पैकी एक असलेल्या 'शार्क टँक इंडिया'च्या (Shark Tank India 2) दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा आता संपली आहे. 2 जानेवारी 2023 पासून सोनी टीव्हीवर त्याचे प्रसारण सुरू झाले आहे. या शो मध्ये शार्क (परिक्षक) म्हणून अमन गुप्ता, पियुष बन्सल, नमिता थापर, विनिता सिंग आणि अनुपम मित्तल व अमित जैन पाहायला मिळाले. या शो च्या पहिल्या एपिसोडमध्ये अनेक लोकांनी आपल्या बिझनेससंबंधित आयडिया सांगितल्या आहेत, ते जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
एक कोटी रुपयांची ऑफर
यशोदा आणि रिया या दोन बहिणींनी या शो मध्ये ब्रँड ‘Hoovu’ (फुलांवर आधारित व्यवसाय) याबद्दल परिक्षकांना सांगितले. त्यांच्या या व्यवसायाला नमिता-विनिता आणि अमन-पीयूष यांनी ऑफर दिली, पण या दोन बहिणींनी अमन आणि पीयूषच्या ऑफरचा स्वीकार केला. त्यांना दोन टक्के इक्विटीवर एक कोटी रुपयांची ऑफर मिळाली. या सीझनची पहिली बिझनेस आयडिया अतिशय वेगळी होती. अनुपम मित्तल सोडून बाकीच्या चार शार्कला ही आयडिया आवडली.
पहिल्या सीझनमध्ये, रणविजय सिंग होस्ट (अँकर) म्हणून होता, परंतु यावेळी त्याची जागा प्रसिद्ध YouTuber राहुल दुआने घेतली. राहुलने आपल्या हसण्याने आणि विनोदाने वातावरण मजेशीर बनवले होते.
अनुपम मित्तल यांनी चहा दिला
यानंतर दुसरा विषय हा चहा संबंधित होता. यावेळी दोन मित्रांनी चहा-आधारित आपला ब्रँड ‘Doorji’ बाबत माहिती जजला सांगितली. तसे ही दार्जिलिंग चहासाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही मित्रांनी शो मध्येच चहा बनवला आणि अनुपमने यांनी त्यांच्या सह-शार्कला चहाचा कप ही दिला. यानंतर अनुपम, पीयूष आणि विनिता यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि या दोन मित्रांनी त्यांची ही ऑफर स्वीकारली.
हा शो कधी पाहू शकता?
'शार्क टँक इंडिया सीझन 2' हा शो तुम्ही सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर पाहता येईल. तसेच तुम्ही हा शो OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर देखील पाहू शकता.