Sharing Facility will be Closed on Netflix: नेटफ्लिक्सच्या एकाच पासवर्डवर मनोरंजनाचा आनंद घेणारे अनेक युजर्स असतात. जसे की, कुटुंब, मित्र मैत्रिणीं एकाच पासवर्डवर मनोरंजनाचा आनंद घेत असतात. पण आता या सार्वजनिक पासवर्डला नेटफ्लिक्सकडून अतिरिक्त चार्ज आकारले जाणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.
पासवर्ड शेयरिंग सुविधा बंद (Turn Off Password Sharing Facility)
Netflix युजर्स वेब सीरिज आणि चित्रपट पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल, तर आता तुमच्या सार्वजनिक पासवर्ड म्हणजेच पासवर्ड शेअरिंगच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. तुमची ही सुविधा आता लवकरच बंद होणार आहे. नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आले आहे की, नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचा लॉगिन-पासवर्ड आता इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर केला, तर त्याला वेगळे शुल्क द्यावे लागणार आहे. या तिमाहीच्या अखेरीस सशुल्क शेअरिंग सेवा सुरू होणार असल्याचे, कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
नेटफ्लिक्स सब्सस्क्रिप्शन (Netflix Subscription)
कंपनीव्दारे सांगण्यात आले आहे की, नेटफ्लिक्सच्या माध्यमातून युजर्सला एक चांगली सुविधा व मनोरंजनाचा आनंद घेता यावा, यासाठी आमचे कर्मचारी खूप मेहनत घेत असतात. अमेरिकन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने 2022 पर्यंत 23 कोटी 10 लाख पेड सब्सस्क्रिप्शन पूर्ण केले आहेत. कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये कमी किमतीतील जाहिरातीचा टियरदेखील लाँच केला होता. आता तो प्लॅन यूएस, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, यूके, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको आणि स्पेनसह 12 बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सवर पेड सब्सस्क्रिप्शन डिसेंबर 2022 च्या तिमाहीत जागतिक स्तरावर 77 लाख होता या तुलनेत 2021 मध्ये 83 लाख इतके होते. गेल्या वर्षी डिसेंबर तिमाहीत 18 लाख नवीन युजर्स नेटफ्लिक्सशी जोडले गेले आहेत.
का बंद केली शेयरींग (Why did Sharing Stop)
नेटफ्लिक्स आता फक्त एकच डिव्हाईस म्हणजेच मोबाईलमध्ये लॉगिन करता येणार आहे. आतापर्यंत असे होते की, जर एखाद्या व्यक्तीने नेटफ्लिक्सचे सब्सस्क्रिप्शन घेतले असेल, तर तो त्याचा लॉगिन पासवर्ड त्याच्या 4-5 जवळच्या मित्रांसोबत शेअर करत होता. यामुळे प्रत्येकजण एकाच सबस्क्रिप्शनवर या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेत होते. मात्र यामुळे कंपनीचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे कंपनीने लॉगिन पासवर्ड शेअरिंगची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.