Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होणार!

Union Budget 2023

Image Source : www.wikipedia.com

Union Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिले सत्र साधारण 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत चालते. तर दुसरे सत्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन तो मे महिन्यापर्यंत चालतो. हे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होण्याची शक्यता आहे.

Union Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिले सत्र साधारण 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत चालते. तर दुसरे सत्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन तो मे महिन्यापर्यंत चालतो. हे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. फेब्रवारी महिन्यापर्यंत हे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्रातील अधिवेशन या नवीन इमारतीत पार पडेल, असा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

31 जानेवारी, 2023 पासून अधिवेशनाला सुरूवात

संसदेच्या परंपरेनुसार आणि नियमाप्रमाणे यावर्षीही केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी, 2023 पासून सुरू होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहातील (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्यांची संयुक्त बैठक आयोजित करून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (Draupaudi Murmu, President of India) अभिभाषण करतील. त्यानंतर 1 फ्रेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman, Finance Minister, Govt. of India) देशाचा अर्थसंकल्प मांडतील.

जुन्या संसदेजवळच नवीन इमारतीची रचना

संसदेच्या पहिल्या सत्रातील अधिवेशन 8 किंवा 9 फेब्रुवारीपर्यंत संपते. त्यानंतर काही दिवसांची सुट्टी घेऊन दुसरे सत्र मार्च महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात सुरू होते. दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन मे महिन्यापर्यंत चालते. सध्या संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्रातील अधिवेशन या नवीन इमारतीत घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. संसंदेची नवीन इमारत जुन्या इमारतीला लागूनच आहे. या इमारतीसाठी एकूण 971 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

जुन्या इमारतीपेक्षा तीनपट मोठी इमारत 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi, Prime Minister of India) यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या कामाचा शुभारंभ 2020 मध्ये केला होता. संसदेच्या नवीन इमारतीचे काम टाटा प्रोजेक्टस करत आहे. या इमारतीत एक मोठा कॉन्स्टीट्यूशनल हॉल असणार आहे. या हॉलमध्ये भारतातील लोकशाहीची मूल्ये आणि इतिहास पाहता येणार आहे. संसदेच्या सदस्यांसाठी या इमारतीत एक मोठा हॉल असणार आहे. तसेच लायब्ररी, समित्यांसाठी वेगवेगळी कार्यालये, डायनिंग हॉल आणि भलीमोठी पार्किंग व्यवस्था असणार आहे. संसदेची नवीन इमारत 64,500 स्क्वेअर मीटर एवढ्या मोठ्या प्रशस्त जागेवर पसरलेली आहे. ही नवीन इमारत जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार स्क्वेअर मीटरने मोठी आहे. या नवीन लोकसभेच्या सभागृहात सुमारे 800 हून अधिक सदस्य एकावेळी बसू शकतात. तर राज्यसभेमध्ये 326 आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही इमारत 3 मजल्यांची असणार आहे.