Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GCM Capital Advisors: जीएसएम कॅपिटल अॅडव्हायझरच्या पेनी स्टॉकने 3 दिवसांत दिला, 60% परतावा!

GCM Capital Advisors Share

Image Source : www.upstox.com

GCM Capital Advisors: जीएसएम कॅपिटल अॅडव्हायझर या वित्तीय कंपनीचा पेनी स्टॉक सध्या तेजीत आहे. या शेअरने गेल्या तीन दिवसांत गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा मिळवून दिला आहे, ज्यामुळे हा पेनी स्टॉक चर्चेत आलेला आहे. याबाबतची अधिक माहिती पुढे वाचा.

GCM Capital Advisors Share Price: सध्या भारतीय शेअर बाजारात अस्थिर वातावरण आहे. संमिक्ष जागतिक संकेत, बजेटचे अंदाज आणि येणारे तिमाहीचे निकाल यामुळे बाजारात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. त्यातच जीसीएम कॅपिटल अॅडव्हायझरच्या पेनी शेअर्स गुंतवणुकदारांना तीन दिवसांमध्ये 60 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून हा पेनी स्टॉक सतत अप्पर सर्कीटमध्ये जात आहे.

जीसीएम कॅपिटल ऍडवायसर्स लिमिटेड या कंपनीचा शेअर सध्या तेजीत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, 20 जानेवारी रोजी 20 टक्क्यांच्या वाढीसह 9.54 रुपयांवर बंद झाला. सध्या शेअर 0.26 पटीने ट्रेड करत आहे. सतत शेअरमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक गुंतवणुकदार शेअर खरेदीसाठी पुढे सरसावत आहेत.

जीएसएम कॅपिटल अॅडव्हायझर कंपनीविषयी (About GSM Capital Advisor Company)

जीएसएम कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेड ही पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून कंपनी कायदा, 1956 अंतर्गत  9 मे 2013 रोजी कंपनी रजिस्ट्रार करण्यात आली आहे. कंपनीला 31 मे 2013 रोजी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, महाराष्ट्र, मुंबई यांनी जारी केलेले व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले.

ही एक वित्तीय सेवा कंपनी आहे, जी मुख्यत्वे आर्थिक सल्ला सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. ग्राहकांना कर्ज आणि इक्विटी आणि गुंतवणूक याबाबत मार्गदर्शन करते. तसेच ट्रेझरी ऑपरेशन्समध्येही  गुंतलेली आहे. ट्रेझरी ऑपरेशन्सचा एक भाग म्हणून, कंपनी विविध कंपन्यांमध्ये कर्ज आणि इक्विटीच्या स्वरूपात गुंतवणूक करते. सध्या कंपनीचे कार्यकारी संचालक विकी अग्रवाल आहेत. कंपनीचे कार्यालय मुंबई आणि कोलकाता येथे आहे.

कंपनीचे एकूण मूल्यांकन (बाजार मूल्य) 9 कोटी आहे. कंपनीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीचे एकूण उत्पन्न 2.518 कोटी होते आणि एकूण विक्री 2.501 कोटी होती. कंपनीचा निव्वळ नफा 0.065 कोटी होता. जीसीएम कॅपिटल अॅडव्हायझर्सनी 2022 वर्षात 0.002 कोटीचा कर भरला आहे.