Women IPL Auction 2023: महिलांच्या पहिल्या आयपीएल लिलावात स्मृती मानधनाची छाप पडली आहे. तिच्यावर लिलावादरम्यान कोट्यवधी रुपयांच्या बोलीचा जणू काही वर्षावच झाला. सगळ्यात अगोदर स्मृतीवर बोली लावली गेली आणि पहिल्याच बोलीत तिच्यावर सर्वाधिक पैसे लावत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3.40 कोटी रुपयांची बोली लावत विकत घेतले. तर महिला इंडियन क्रिकेट टीमची कॅप्टन हरमनप्रीत हिला मुंबई इंडियन्सने 1.8 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले.
Table of contents [Show]
स्मृती मानधनासाठी 3.40 कोटींची बोली
इंडियन महिला क्रिकेट टीमची वाईस कॅप्टन स्मृती मानधना हिच्यावर विमेन्स प्रीमिअर लीग (Women Premier League 2023) लिलावादरम्यान मोठ्या प्रमाणात बोली लागली होती. मुंबई आणि आरसीबी टीमने स्मृती मानधनावर जोरदार बोली लावली होती. पण या सर्वांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3.40 कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली. स्मृतीचा सध्याचा फॉर्म पाहता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिच्याकडे कप्तानपद देण्याची शक्यता आहे.
स्मृती मानधनाची क्रिकेटमधील कारकार्द
स्मृती मानधनाकडे 112 टी-20 इंटरनॅशनल मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये तिने आतापर्यंत 2651 रन्स केले आहेत. तिचा बॅटिंग एव्हरेज 27.32 आहे. तर टी-20 इंटरनॅशनल मॅचमध्ये तिचा स्ट्राईक रेट 123 पेक्षा अधिक आहे. तिच्या नावावर 15 हून अधिक अर्धशतकेसुद्धा आहेत.
स्मृती मानधनापाठोपाठ सर्वाधिक किंमत मिळणारी खेळाडू ठरली आहे, अॅशलेह गार्डनर. हिला गुजरात जायंट्सने 3.2 कोटी रुपये बोली लावून खरेदी केले. तर दीप्ती शर्माला 2.6 कोटी रुपयांची बोली लावून युपी वॉरिअर्सने खरेदी केले. त्यानंतर एलिस पेरीला हिला रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने 1.7 कोटी रुपये ाणि सोफी एक्लेस्टोन हिला युपी वॉरियर्सने 1.8 कोटी रुपये बोली लावून खरेदी केले.
लिलावात तब्बल 409 महिला खेळाडुंचा सहभाग
मुंबईत होणाऱ्या विमेन्स प्रीमिअर लीगसाठी (Women Premier League 2023) आज लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात तब्बल 409 महिला क्रिकेट खेळाडुंचा सहभाग असणार आहे. यातील 90 महिला खेळाडुंचा आज लिलाव होणार आहे. प्रथमच महिला प्रीमियर लीगचा लिलाव असल्याने टीमसह चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उस्तुकता आहे. महिलांची आयपीएल स्पर्धा 4 ते 26 मार्च या दरम्यान खेळवली जाणार आहे.
लिलावासाठी बेस प्राईस 50 लाख रुपये
महिलांच्या आयपीएल लिलावासाठी बेस प्राईस 50 लाख रुपये आहे. यामध्ये महिला क्रिकेट टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि वाईस कॅप्टन स्मृती मानधना या दोघींसह आणखी 8 इंडियन महिला खेळाडुंचा या बेस प्राईसच्या यादीत समावेश आहे.