Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Recap 2022: 'या'बॉलिवूड स्टार्सनी खरेदी केलेली आलिशान घरं 2022 मध्ये ठरली चर्चेचा विषय

Bollywood Star Dream Homes

Bollywood Star Dream Homes: 2022 या वर्षात बॉलिबूडमधील काही कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातील ड्रीम होम खरेदी केले आहे ज्यामुळे ते यावर्षी चर्चेत राहिले आहेत.

Bollywood Star Dream Homes: 2022 हे अनेकांसाठी 'लकी इयर(Luck Year)' ठरलं आहे तर बऱ्याच जणांना यावर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. यापासून बॉलिवूड स्टार देखील काही दूर नाहीयेत. यावर्षी काही कलाकारांचे ड्रीम होम(Dream Home) घेण्याचे स्वप्न साकार झाले आहेत. त्यांच्या याच घरामुळे ते यावर्षी चर्चेत देखील राहिले आहेत. नक्की कोण आहेत हे कलाकार आणि त्यांच्या घराची किंमत(Home Price) किती चला जाणून घेऊयात.

debit-credit-2022-2.png

अमिताभ बच्चन( Amitabh Bachchan)

बिग बी(Big B) नी देखील याच वर्षात मुंबईतील एका गगनचुंबी इमारतीमध्ये 12,000 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट घेतला आहे. पार्थेनॉन सोसायटीच्या(Parthenon Society) 31 व्या मजल्यावर त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली असून ते येथे राहणार नाहीत. त्यांनी गुंतवणुकीसाठी(investment) ही मालमत्ता खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण(Ranveer Singh and Deepika Padukone)

सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी यावर्षीच अलिबाग तालुक्यातील मापगाव(Mapgaon) येथे 90 गुंठे एने(NA) जागा 22 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. रणवीर आणि दीपिकाने मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये दोन बंगले खरेदी करून स्वतःच्या ड्रीम हाऊसचे स्वप्न यावर्षात पूर्ण केले आहे.

सनी लिओनी(Sunny Leone)

सनी लिओनीने मुंबईतल्या अंधेरी भागात 4,365 स्क्वेअर फूटाचा फ्लॅट खरेदी केला असून ज्याची किंमत 16 कोटी रुपये इतकी आहे. रिऍल्टर क्रिस्टल प्राईड डेव्हलपर(Realtor Crystal Pride Developer) यांचा हा प्रकल्प असून तिचा हा फ्लॅट 12 व्या मजल्यावर आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सनीला 3 गाड्यांसाठी मेकॅनाईझ्ड कार पार्किंगही देण्यात आले आहे.

मिलिंद सोमण(Milind Soman)

आपल्या सर्वांनाच मिलिंद सोमण चांगलाच परिचयाचा आहे. नुकतेच त्याने सप्टेंबरमध्ये मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. सी-फेसिंग असलेले त्याचे हे घर 4 बीएचके असून या घराची जागा 1720 स्क्वेअर फुट आहे. दादर बीचच्या(Dadar Beach) आणि सिद्धिविनायक मंदिराच्या(Siddhivinayak Temple) अगदी जवळ हे घर आहे. मिलिंदचं हे घर सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडच्या(Suraj Estate Developers Limited) ‘ओशन स्टार(Ocean Star)’ या स्टँडअलोन टॉवरमध्ये घेण्यात आले आहे.

विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri)

विवेक अग्निहोत्रीने वर्सोवा भागात 'Ecstasy Realty' यांच्याकडून फ्लॅट खरेदी केला आहे. 20 मजली इमारतीतील हे घर 3258 स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचे आहे. त्यासोबतच  3 गाड्या पार्क होतील अशी पार्किंची सोय देखील उपलब्ध आहे. त्याच्या या घराची किंमत 17.92 कोटी इतकी आहे.