Indian Rupee Currency Used Other Countries : भारतीय चलन केवळ भारतातच नाही, तर परदेशातही चालते. जगात असे काही देश आहेत, जिथे तुम्ही गेलात तर थेट भारतीय रुपये देऊन वस्तू विकत घेऊ शकता. कारण, तुम्हाला तुमचे भारतीय रुपये त्या देशाच्या चलनात बदलण्याची गरज नाही. त्यामुळे तिथे जर का तुम्ही वस्तू खरेदी करण्यास गेले, तर तुम्हाला चलनाशी संबंधित कोणतीही अडचण येणार नाही. भारताच्या शेजारील देश भूटान आणि नेपाळ या देशामध्ये भारतीय रुपया चालतो. त्यामुळे तुम्ही तेथे जाऊन थेट खरेदी करु शकता.
'या' देशात जा खरेदीला
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा चलनात राहतील, असे सांगितले आहे. त्यामुळे तुमच्या जवळ मोठ्या प्रमाणात जर का 2000 च्या नोटा असतील, तर तुम्ही भारताशिवाय, भूटान आणि नेपाळ येथे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. कारण भूतानसोबत भारताचा रुपया पेग्ड म्हणजेच स्थिर आहे. म्हणजे भारतीय रुपयाच्या विनिमय दरात कोणताही बदल येथे होत नाही. त्यामुळे तुम्ही जर नेपाळ किंवा भूतानमध्ये फिरायला गेलात तर, तुम्ही तेथे अगदी मनसोक्त खरेदी करु शकता. मात्र, हे करीत असतांना काही अटींचे पालन करणे, अत्यावश्यक ठरते.
कुठे-कुठे चालतो भारतीय रुपया
नेपाळ आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. नेपाळ येथील रोजगाराचा आणि नोकऱ्यांचा प्रमुख स्त्रोत भारत आहे. यामुळे तिथले लोक भारतीय चलन असलेला रुपया सहज स्विकारतात. नेपाळ- आणि भूतान व्यतिरिक्त, आफ्रिकेतही झिम्बाब्वे हा एक असा देश आहे, जिथे भारतीय रुपया कायदेशीर चलन म्हणून स्विकारल्या जातो. तसेच, बांग्लादेश आणि मालदीवच्या अनेक भागात भारतीय रुपया अनौपचारिक पध्दतीने स्विकारल्या जातो. कारण, भारत या देशातील लोकांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करतो.
अशा आहेत काही अटी
मात्र तुम्ही नेपाळमध्ये खरेदी करण्यास गेले असता, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे, तिथे तुम्हाला 100 रुपयांच्या वरची नोट वापरण्याची परवानगी नाही. RBI ने नेपाळला फक्त 100 रुपयांची नोट नेण्याची परवानगी दिली आहे. तसेच, नेपाळमध्ये 500 किंवा 200 च्या नोटा घ्यायच्या असतील, तर तुम्ही फक्त 25 हजार रुपयांपर्यंतच घेऊ शकता.